पुणे जिल्ह्यात ३८ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : जून महिन्यात पडलेल्या पावसाच्या खंडाचा फटका खरीप पेरणीला बसला आहे. पुणे जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र दोन लाख ३० हजार ८२६ हेक्‍टर आहे. त्यापैकी रविवार अखेरपर्यंत (ता.८) अवघ्या ३८ हजार ५२५ हेक्‍टरवर म्हणजेच सरासरी १६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत १६ टक्‍क्‍यांनी पेरणी क्षेत्रात घट झाल्याचे दिसून येत असल्याचे कृषी विभागाने सांगितले.   

गेल्या वर्षी जून महिन्यात वेळेवर पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर पेरण्या केल्या होत्या. जिल्ह्यात गतवर्षी याच कालावधीत ७४ हजार ८८९ हेक्‍टरवर म्हणजेच ३२ टक्के पेरणी झाली होती. यंदा हवामान विभागाने पावसाचा चांगला अंदाज दिला होता. मात्र, वेळेवर पाऊस सुरू न झाल्याने उपलब्ध खरीप पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. त्यातच १० ते २० जून या कालावधीत जिल्ह्यात पावसाचा खंड व पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने खरीप पेरण्यांना उशिराने सुरवात झाली.

आत्तापर्यंत भात, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, कारळे, सोयाबीन या पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत; परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत भात लागवडीत सात टक्‍क्‍यांपर्यंत घट झाली आहे. खरीप ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात सात, बाजरीच्या पेरणी क्षेत्रात ३३, मका पेरणी क्षेत्रात ४८, तुरीच्या पेरणी क्षेत्रात २२, मुगाच्या क्षेत्रात ६९, उडदाच्या क्षेत्रात ७३, भुईमुगाच्या क्षेत्रात सहा टक्के घट झाली आहे. कारळे पिकाच्या क्षेत्रात सहा, सूर्यफुलाच्या क्षेत्रात एक, सोयाबीन पिकाच्या पेरणीच्या क्षेत्रात २९ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. 

जिल्ह्यात भाताचे ७२ हजार ९५३ हेक्‍टर क्षेत्र आहे. हे सर्व क्षेत्र भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात आहे. भात लागवडीसाठी जिल्ह्यात सुमारे पाच हजार ८२० हेक्‍टरवर भात रोपवाटिका तयार झाल्या आहेत. जूनमध्ये पडलेल्या पावसाच्या खंडामुळे भाताच्या पुनर्लागवडी लांबल्या असून आत्तापर्यंत अवघ्या तीन हजार १०३ हेक्‍टरवर पुनर्लागवडी झाल्या आहेत.

बाजरी पिकांचे ४४ हजार ९४ हेक्‍टर एवढे क्षेत्र आहे. पूर्वेकडील शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्‍यांत हे पिके घेतले जाते. आत्तापर्यंत बाजरीची अवघी १३ हजार १४० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. उर्वरित मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, मका या पिकांची अत्यंत कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहेत.    

प्रमुख पिकनिहाय झालेली पेरणी ः (क्षेत्र, हेक्‍टर)
पीक  सरासरी क्षेत्र पेरणी झालेली क्षेत्र  टक्के
भात    ७२,९५३  ३१०३
ज्वारी     ७०६१ १६
बाजरी ४४,०९४  १३,१४०  ३०
मका ११,१८३  ४१०५  ३७
इतर तृणधान्ये  ३३२७
तूर ३५६३   २२८
मूग  ८०६९ १९११ २४
उडीद ३०६४  ३९५ 
इतर कडधान्ये १४,६१७ 
भुईमूग ४१,४०९ ६२०५ १५
तीळ  १७८७
कारळे २४७७ १४१
सूर्यफूल  ९४१  १४   १
सोयाबीन ५२००  ९२१४ १७७
इतर तेलबिया ३०९ १० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com