पुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिप

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे खरिपातील पिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र दोन लाख ३० हजार ८३० हेक्‍टर आहे. त्यापैकी एक लाख ४७ हजार ६८६ हेक्‍टरवर म्हणजेच सरासरी ६४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात भात पिकाची ५६ हजार ३७९ हेक्‍टरवर पुनर्लागवड झालेली आहे. जोरदार पावसामुळे भात पीकवाढीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी अजूनही भात लागवडी सुरू आहेत. भोर, वेल्हा, मावळ या तालुक्‍यांत ५९२ हेक्‍टरवर यंत्राद्वारे भात लागवड प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. बाजरी पीकवाढीच्या अवस्थेत असून शिरूर, दौड, इंदापूर, बारामती व पुरंदर या तालुक्‍यांमध्ये पुरेशा पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे.

जूनच्या सुरवातीच्या काळात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे मूग व उडीद या पिकांची पेरणी क्षेत्र कमी झाले आहे. सुरवातीस पेरलेले मूग पीक फुलोरा अवस्थेत असून, शिरूर तालुक्‍यात काही ठिकाणी पावसाअभावी पिके सुकू लागली आहेत. भुईमूग पीकवाढीच्या अवस्थेत आहेत. सोयाबीन पिकाचे सरासरी पाच हजार २०० हेक्‍टर क्षेत्र भोर, जुन्नर, खेड, आंबेगाव व बारामती तालुक्‍यांमध्ये आहे.

जिल्ह्यामध्ये १७ हजार ९४६ हेक्‍टरवर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. हे पीकवाढीच्या अवस्थेत आहे. सोयाबीन पिकांवर अल्पप्रमाणात किडींचा प्रादुर्भाव झाला असून, कृषी विभागामार्फत योग्य त्या उपाययोजना सुचविल्या जात आहेत. मका पीकवाढीच्या अवस्थेत आहे. कापूस पिकाची शिरूर, बारमती, इंदापूर, दौंड या तालुक्‍यांमध्ये मिळून ४७ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. हे पीकदेखील वाढीच्या अवस्थेत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com