agriculture news in marathi, kharip crops become in trouble, amaravati, maharashtra | Agrowon

अमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 जुलै 2019

अमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. परिणामी, येत्या दोन ते तीन दिवसांत पाऊस न झाल्यास तीन ते साडेतीन लाख हेक्‍टरवर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे.

अमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. परिणामी, येत्या दोन ते तीन दिवसांत पाऊस न झाल्यास तीन ते साडेतीन लाख हेक्‍टरवर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे.

या वर्षी समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता. असे असताना रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेले. आर्द्रा नक्षत्रात पावसाला सुरवात झाली. हवामान विभागाकडून २४ जूनपासून मॉन्सूनच्या सक्रियतेची घोषणा करण्यात आली. या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळालेला दिलासा अल्पसा ठरला. जूनच्या अखेरीस पावसाला सुरवात झाल्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पेरण्या झालेल्या पिकांनी माना टाकल्या, तर ६ ते ७ जूननंतर पेरणी झालेल्या जमिनीत ओलावाच नसल्याने बीजांकुर करपायला लागले आहेत.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र सात लाख २८ हजार हेक्‍टर असून, त्यापैकी चार लाख ५४ हजार हेक्‍टर क्षेत्रात सद्यःस्थितीत पेरणी झाली आहे. पेरणीची टक्‍केवारी ६२ आहे. यामध्ये सर्वाधिक १ लाख ८६ हजार ६६७ हेक्‍टर क्षेत्रात कपाशी, १ लाख ६९ हजार ७७९ हेक्‍टर क्षेत्रात सोयाबीन आहे. याव्यतिरिक्‍त ६७ हजार ६७४ हेक्‍टरवर तूर आहे.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...