पुणे जिल्ह्यात पावसाअभावी पिके सुकू लागली

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात १५ दिवसांपासून उघडीप दिली आहे. बुधवारी (ता. १) पुणे जिल्हयातील मुळशी, भोर, मावळ, वेल्हे, जुन्नर तालुक्‍यात पावसाच्या हलक्‍या सरी बरसल्या. मात्र, पूर्वेकडील भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पाण्याअभावी पिके सुकू लागल्याचे चित्र आहे.

पश्‍चिम पट्ट्यात जून महिन्यात चांगला पाऊस झाल्यामुळे धरणांतील पाणीसाठा बऱ्यापैकी वाढला होता. मात्र, आता पावसाचा जोर ओसरल्याने धरणातील पाणीपातळी पुन्हा कमी होऊ लागली  आहे. बुधवारी (ता. १)  मावळ तालुक्‍यातील लोणावळा येथे सर्वाधिक ४८.० मि.मी. पावसाची नोंद झाली. जून महिन्यात कमी अधिक प्रमाणात    झालेल्या पावसामुळे खरिपाच्या  बऱ्यापैकी पेरण्या झाल्या आहेत.

यंदा वेळेवर पाऊस झाला असता, तर पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाचा होता. परंतु जून महिन्यात पडलेल्या पावसाच्या खंडामुळे पेरणीच्या क्षेत्रात घट झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र दोन लाख ३० हजार ८३० हेक्‍टर असून, त्यापैकी एक लाख १९ हजार ८१० हेक्‍टरवर म्हणजेच ५१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सध्या अनेक भागात पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. परंतु पुन्हा पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे शिरूर, पुरंदर, बारामती भागातील पिके काही प्रमाणात सुकत असल्याचे चित्र आहे.

बुधवारी हवेलीतील पुणे शहरात अधूनमधून पावसाच्या हलक्‍या सरी बरसल्या. मुळशीतील पौड येथे ४.०, घोटावडे येथे १०.०, मळे येथे २८.०, मुठे येथे २९.०, पिरंगुट येथे ३.० मि.मी. पावसाची नोंद झाली. भोरमधील भोळावडे येथे १२.०, निगुडघर येथे १९.०, वडगाव मावळ तालुक्‍यातील तळेगाव येथे २.०, काले येथे ६.०, कार्ला येथे १२.०, खडकाळा येथे १३.०, वेल्हे तालुक्‍यातील वेल्हा येथे ७.०, पानशेत येथे ४.०, विंझर येथे ३.०, जुन्नरमधील राजुर येथे २६.०, डिंगोरे येथे ६.०, आपताळे येथे १.०, खेडमधील कुडे येथे ५.०, पाईट येथे २.०, कडूस येथे २.० मिमी पावसाची नोंद झाली. आंबेगावमध्ये हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com