agriculture news in marathi, kharip festival at agriculture colleage, pune, maharashtra | Agrowon

पीक उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्याची गरज : डॉ. विजय भटकर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

पुणे  ः  कृषी विद्यापीठांकडून शेतकरी आणि शासनाच्या अनेक अपेक्षा आहेत. शेतकरी विद्यापीठाचे तंत्रज्ञान समजून घेत शेतीत बदल करीत आहेत. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. मात्र, भविष्यात उत्पादनावरील खर्च कमी करून अधिक उत्पन्न वाढविण्याची गरज आहे, असे मत नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.    

पुणे  ः  कृषी विद्यापीठांकडून शेतकरी आणि शासनाच्या अनेक अपेक्षा आहेत. शेतकरी विद्यापीठाचे तंत्रज्ञान समजून घेत शेतीत बदल करीत आहेत. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. मात्र, भविष्यात उत्पादनावरील खर्च कमी करून अधिक उत्पन्न वाढविण्याची गरज आहे, असे मत नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.    
महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत पुणे कृषी महाविद्यालयात मंगळवारी (ता.१५) एकदिवसीय खरीप कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाचे उद् घाटन डॉ. भटकर यांच्या हस्ते झाले. या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, कृषी आयुक्त सुहास दिवसे, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, कामधेनू विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य प्रतापराव भोसले, फलोत्पादन संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, कुलसचिव डॉ. सोपान कासार, नियंत्रक विजय कोते, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील मासाळकर, सहयोगी संशोधन संचालक विनय सुपे उपस्थित होते.  

या वेळी श्री. भटकर म्हणाले, की कृषी आणि संगणकाचा घनिष्ठ संबध आहे. कृषी ही संस्कृती आहे. या संस्कृतीला तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन संशोधन वेगाने होत आहे. त्यामुळे कृषीक्षेत्रात रोजगाराच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होत आहेत. कृषी विद्यापीठाकडून नवीन संशोधन केले जात आहे. त्यासाठी आव्हानेही खूप आहेत. त्यावर मात करायची असेल, तर संशोधनाशिवाय पर्याय नाही. संशोधनाच्या माध्यमातून तंत्रज्ञानावर आधारित पॉलिहाउस, नवीन अवजारे, यंत्रे विकसित होत आहेत. या माध्यमातून गावाचा विकास होण्याची देखील आवश्यकता आहे. यासाठी उन्नत भारत अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून कृषी विद्यापीठे व गावांतील शेतकऱ्यांना जोडण्याचे काम सुरू आहे. त्यातून गावांचा विकास होणार आहे. 

कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा म्हणाले, की बदलत्या हवामानामुळे पिके घेण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. एकीकडे दुष्काळ; तर दुसरीकडे अतिपाऊस यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. कमी बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सरकारने किमान बाजारभाव देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. शेतीवरील वाढत असलेला खर्च कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येत आहे.  
यावेळी सहायक प्राध्यापक डॉ. पल्लवी सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. 

इतर ताज्या घडामोडी
बटाटा, टोमॅटोतील उशिरा येणाऱ्या करपा...बटाटा आणि टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये प्रचंड...
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...मुंबई ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...
भारत 'या' देशाला देणार कापूस...नागपूर ः मुस्लिम बहूल असलेल्या अझरबैजान देशातील...
कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरची...नाशिक : परराज्यांत होणाऱ्या कांद्याच्या...
हमीभाव खरेदी केंद्रावर आली वजनकाटे...अकोला ः शासनाने या हंगामात सुरु केलेल्या आधारभूत...
मराठवाड्यात रब्बी पेरणीला मिळेना गती लातूर : मराठवाड्यातील रब्बी पेरणीची गती...
परभणी जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सद्य:स्थितीत...
अरुणा प्रकल्पग्रस्तांनी मांडले...सिंधुदुर्ग : आयुक्त कार्यालयावर ‘दे धडक बेधडक’...
पाण्याच्या निचऱ्यासाठी गादीवाफ्यावर धान...भंडारा ः‘पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा...
अस्मानीमुळे नुकसान सोसवेना, चालविली...नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून...
अचूक सांख्यिकीमुळे शेती उत्पन्न वाढविणे...नवी दिल्ली: बदलत्या हवामानाच्या आव्हानावर...
पुणे जिल्हा परिषदेत येणार ‘महिला राज’पुणे  : जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष...
पुणे बाजार समितीत रताळ्यांची २० टन आवक...पुणे  ःकार्तिकी एकादशीनिमित्ताने पुणे बाजार...
कशामुळे घटले साताऱ्यातील स्ट्राॅबेरीचे...सातारा  ः जिल्ह्यात अतिपावसाचा फटका...
साताऱ्यात पुढील वर्षी सहकारी संस्थांची...सातारा  : आगामी वर्ष हे सहकारातील विविध...
नगर जिल्हा परिषदेतही वाहताहेत...नगर ः राज्यात एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर...
थकीत पीकविम्यासाठी किसान सभेचा पुण्यात...पुणे  ः बीडमधील शेतकऱ्यांना थकीत पीकविम्याची...
किसान सभेचे सोमवारपासून राज्यभर आंदोलन...पुणे  ः अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. या...
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्र...मुंबई  : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यावर...
भारतीय मक्याचे पुढे काय होते ? जाणून...मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील चार...