खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर 

कोरोना पुणे मुंबई बातमी खरीप हंगाम २०२०-२१ मधील पीक उत्पादनाचा पहिला सुधारित अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केला आहे.
food grain
food grain

नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी खरीप हंगाम २०२०-२१ मधील पीक उत्पादनाचा पहिला सुधारित अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केला आहे. खरिपात धान्योत्पादन विक्रमी १४४.५२ दशलक्ष टन होणार असल्याचे नमूद केले आहे. गेल्यावर्षी खरिपात १४३.४ दशलक्ष टन धान्योत्पादन झाले होते. राज्यांकडून आलेल्या आकडेवारीला इतर स्रोतांकडून प्रमाणित करुन घेत, हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.   गेल्यावर्षीपेक्षा यंदा १६ सप्टेंबरपर्यंत मॉन्सूनचा पाऊस ७% अधिक पडला आहे. त्यानुसार, खरीप पिकांसाठी महत्त्वाच्या बहुतांश राज्यात सामान्य पाऊसमान होते. त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार, यंदा अनेक राज्यांत खरिपाचे उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा अधिक असेल. पहिल्या सुधारीत अंदाजानुसार, देशात यंदा खरिपाचे एकूण धान्योत्पादन उत्पादन १४४.५२ दशलक्ष टन एवढे असणार आहे. गेल्या पाच वर्षांच्या (२०१४-१५ ते २०१८-१९) सरासरी उत्पादनाच्या तुलनेत यंदा ९.८३ दशलक्ष टन अधिक उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.     खरीप धान (तांदळाचे) उत्पादन यंदा अंदाजे १०२.३६ दशलक्ष टन एवढे अपेक्षित आहे. गेल्या पाच वर्षांच्या (२०१४-१५ ते २०१८-१९) सरासरी उत्पादनाच्या तुलनेत यंदा ६.७० दशलक्ष टन अधिक उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. तेलबियांचे उत्पादन २५.७३ दशलक्ष टन होणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन ३.४१ दशलक्ष टन अधिक असण्याचा अंदाज आहे. तर, कापसाचे उत्पादन ३७.१२ दशलक्ष गाठी  (१७० किलो प्रत्येकी) इतके होईल जे गेल्यावर्षीच्या तुलनेत १.६३ दशलक्ष गाठी अधिक आहे. भरडधान्यांचे उत्पादन अंदाजे ३२.८४ दशलक्ष टन होण्याचा अंदाज असून ते सरासरी ३१.३९ दशलक्ष टनांपेक्षा १.४५ दशलक्ष टन अधिक आहे. तागाचे उत्पादन ९.६६ दशलक्ष गाठी (१८० किलो प्रत्येकी) होण्याचा अंदाज आहे.     २०२०-२१ च्या खरीप हंगामात कडधान्यांचे एकूण उत्पादन ९.३१ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. हे उत्पादन गेल्यावर्षीच्या सरासरीच्या तुलनेत, १.५९ दशलक्ष टन अधिक आहे. उसाचे उत्पादन ३९९.८३ दशलक्ष टन होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. यावर्षीचे उत्पादन गेल्या पाच वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ३९.४० दशलक्ष टन अधिक आहे.  

खरीप उत्पादनाचा पहिला सुधारित अंदाज (दशलक्ष टनांत)

पीक २०२०-२१ २०१९-२०
धान १०२.३६ १०१.९
भरडधान्ये ३२.८४ ३४
मका १९.८८ १९.६ 
कडधान्य ९.३१ ७.७
तूर ४.०४ ३.८
तेलबिया २५.७३ २२.३
भुईमूग ९.५४ ८.४
सोयाबीन १३.५८ ११.२
कापूस ३७.१२ ३५.५
ताग आणि मेस्ता ९.६६ ९.७७
ऊस ३९९.८३ ३५५.७

कापूसः दशलक्ष गाठी (१७० किलो प्रत्येकी) तागः दशलक्ष गाठी  (१८० किलो प्रत्येकी)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com