agriculture news in marathi, kharip planning, buldhana, maharashtra | Agrowon

बुलडाण्यात सोयाबीन क्षेत्र वाढण्याची शक्यता
टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 एप्रिल 2018
बुलडाणा  ः गेल्या हंगामात बीटी कपाशीवर झालेला बोंड अळीचा प्रादुर्भाव पाहता या वेळी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता अाहे. त्यामुळे जिल्हा कृषी विभागाने सोयाबीनचे वाढीव क्षेत्र लक्षात घेता बियाण्यांचे नियोजन केले आहे. नुकत्याच झालेल्या अाढावा बैठकीत यादृष्टीने सविस्तर माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
 
बुलडाणा  ः गेल्या हंगामात बीटी कपाशीवर झालेला बोंड अळीचा प्रादुर्भाव पाहता या वेळी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता अाहे. त्यामुळे जिल्हा कृषी विभागाने सोयाबीनचे वाढीव क्षेत्र लक्षात घेता बियाण्यांचे नियोजन केले आहे. नुकत्याच झालेल्या अाढावा बैठकीत यादृष्टीने सविस्तर माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
 
बुलडाणा जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र सात लाख ३२ हजार हेक्टर अाहे. यामध्ये सोयाबीनचे सरासरी क्षेत्र दोन लाख ८८ हजार ५१३ हेक्टर अाहे. दरवर्षी यापेक्षा अधिक लागवड होत असते. गेल्या हंगामात जिल्ह्यात कपाशीची लागवड वाढली होती. परंतु बीटी कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण हंगामाच अडचणीत सापडला होता. सोयाबीनकडून कपाशी लागवडीकडे वळालेले शेतकरी येत्या हंगामात पुन्हा सोयाबीनची लागवड वाढवतील, असा अंदाज असून, किमान १० टक्के वाढ गृहीत धरली जात अाहे.   
 
या हंगामासाठी प्रशासनाने तसे नियोजन केले. जिल्ह्यात हंगामासाठी दोन लाख ६३ हजार ३० क्विंटल बियाणे लागेल. कपाशीचा पेरा होणार असून, यासाठी अाठ लाख ११ हजार ५०० बियाणे पाकिटांची मागणी करण्यात अाली. हंगामात लागवड होणाऱ्या पिकांसाठी एक लाख ३७ हजार ६६० मेट्रिक टन खतांचे अावंटन मंजूर झाले अाहे. त्यापैकी विविध खतांचा २० हजार ७९२ मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला अाहे. मागणीनुसार खतांचा कुठलाही साठा कमी राहणार नाही, असे नियोजन झाले अाहे.

हंगामात बोगस बियाण्यांचे वितरण, लिंकिंगसारखे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथक काम करणार अाहे. यासाठी एक पूर्णवेळ निरीक्षक नेमण्यात अाले असून, जिल्हा परिषद व राज्याच्या कृषी विभागाचे ३७ असे एकूण ३८ निरीक्षक हे काम पाहणार अाहेत.

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...
पक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...
पुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...
‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...
जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...
अमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही...
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...
वनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
लाल कांद्याची लागवड वाढण्याची शक्‍यताजळगाव ः खानदेशात आगाप कांदा लागवडीसंबंधी...