खरिपात शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा करा : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे जिल्हा खरीप आढावा बैठक
पुणे जिल्हा खरीप आढावा बैठक

पुणे  ः दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात वेळेवर पीककर्ज पुरवठा करण्यात यावा, अशी सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सहकार उपनिबंधक आणि बॅंकांना दिली.  

पुणे जिल्ह्याची खरीप आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. ६) झाली. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, जिल्हा पोलिस उपअधिक्षक अनिल लंभाते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. जे. पलघडमल, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार, चंद्रकांत भोर यांच्यासह, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, खते व बियाणे उत्पादक कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

या वेळी जिल्हाधिकारी राम म्हणाले, की जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज आणि कृषी निविष्ठा तालुका स्तरावर तसेच ग्राम स्तरावर वेळेत आणि मुबलक उपलब्ध होतील याकरिता तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी एकत्रित येऊन खरीप आढावा बैठका घ्याव्यात. शेतकऱ्यांना खते व बियाणे कमी पडणार नाही, याची काळजी घ्यावी.

जिल्ह्यातील रेल्वे रेक पॉईंट खतपुरवठ्यासाठी व्यवस्थित उपलब्ध होतील याकडे लक्ष द्यावे. त्यामध्ये बारामती, फुरसुंगी आणि दौंड येथील वाहतूक समस्यांबाबत काही अडचणी आल्यास पोलिस संरक्षण घेऊन खतपुरवठा नियंत्रित व सुरळीत करावा. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आहे. आचारसंहिता संपल्यानंतर जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या तयारीसंदर्भात लोकप्रतिनिधींसमवेत पुन्हा बैठक घेतली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.  या वेळी आभार सुनील खैरनार यांनी आभार मानले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com