agriculture news in marathi, kharip planning meeting,kolhapur, maharashtra | Agrowon

कोणत्याही परिस्थितीत निधी खर्च झालाच पाहिजे : चंद्रकांत पाटील
टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 एप्रिल 2018

कोल्हापूर  : आम्ही निधी आणण्यासाठी रक्त आटवतो आणि तुम्ही निधी परत पाठवता येथून पुढे हे चालणार नाही. कामांचे नियोजन उन्हाळ्यात न करता पावसाळ्यात करा आणि उन्हाळा सुरू होताच कामास प्रत्यक्ष सुरवात करा. कोणत्याही परिस्थितीत निधी खर्च झालाच पाहिजे, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या. 

कोल्हापूर  : आम्ही निधी आणण्यासाठी रक्त आटवतो आणि तुम्ही निधी परत पाठवता येथून पुढे हे चालणार नाही. कामांचे नियोजन उन्हाळ्यात न करता पावसाळ्यात करा आणि उन्हाळा सुरू होताच कामास प्रत्यक्ष सुरवात करा. कोणत्याही परिस्थितीत निधी खर्च झालाच पाहिजे, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या. 

यंदाचा सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा निधी कृषी विभागाने खर्च न झाल्याने परत पाठवला आहे. त्याचे पडसाद रविवारी (ता. ८) येथे आयोजित खरीप हंगाम नियोजन बैठकीत उमटले. श्री. पाटील यांनी निधी परत का गेला? काय त्रुटी राहिल्या याची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. कामे मंजुरीचा कालावधी, सुरू होण्याचा कालावधी यात अंतर पडत असल्याने कामे पूर्ण होत नसल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून देताच त्यांनी भर पावसात गावात जाऊन बैठका घ्या आणि जलसंधारण कामांची गरज ओळखून नियोजन करा असे अधिकाऱ्यांना सुनावले. 

श्री. पाटील म्हणाले, की यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ४ लाख ५ हजार हेक्‍टर क्षेत्र निश्‍चित केले आहे. शेतकऱ्यांना आवश्‍यक पायाभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देत उत्पादकता वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवावे.

आतापासूनच खरिपासाठी लागणाऱ्या बियाणांची, खतांची आणि कीटकनाशकांची मागणी करून ते वेळेवर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे. यामध्ये हयगय करता कामा नये तसेच शेतकऱ्यांना कृषी निविष्ठ दर्जेदार उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने गुणवत्ता नियंत्रण अधिक कडक करावे. जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक अथवा अडवणूक होणार नाही. जिल्ह्यात दर्जेदार निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी गावोगावी गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या भरारी पथकामार्फत तपासणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

या वेळी पंतप्रधान पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना, उसाची एक डोळा पद्धती, राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियान, फलोत्पादन अभियान, पंतप्रधान कृषी सिंचन योजना अशा विविध योजनांचा या वेळी आढावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी घेतला. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, कृषी सहसंचालक कार्यालयातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी आदी या वेळी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...