agriculture news in marathi, kharip season meeting, pune, maharashtra | Agrowon

खरीप हंगामाचे काटेकोरपणे नियोजन करा : कृषी सचिव एकनाथ डवले
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 मे 2019

पुणे  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खंबीरपणे पुढे जाण्याकरिता खरीप हंगाम आणि योजनांबाबत काटेकोर नियोजन करावे, तसेच टप्प्याटप्प्याने राज्यभर शेतीशाळा सुरू करा, अशा सूचना कृषी सचिव एकनाथ डवले यांनी दिल्या. 

पुणे  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खंबीरपणे पुढे जाण्याकरिता खरीप हंगाम आणि योजनांबाबत काटेकोर नियोजन करावे, तसेच टप्प्याटप्प्याने राज्यभर शेतीशाळा सुरू करा, अशा सूचना कृषी सचिव एकनाथ डवले यांनी दिल्या. 

कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्यासमवेत संचालकांसह राज्यातील अधिकाऱ्यांशी श्री. डवले यांनी कृषी आयुक्तालयात बैठक घेतली. क्रॉपसॅप, खरीप हंगाम तसेच विविध योजनांचा आढावा व नियोजनावर या वेळी चर्चा झाली. दुष्काळ तसेच पाऊस लांबणीवर पडत असल्याचे येणारे अंदाज यामुळे खरिपाचे नियोजन काटेकोरपणे करावे लागेल. शेतकऱ्यांना वेळेत खते, बियाणे, कीटनाशके उपलब्ध करून द्यावीत. बोंडअळीमुळे कपाशी बियाण्यांची विक्री एक जूनपासून सुरू करावी, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या.

राज्यात यंदा १२ हजार शेतीशाळा सुरू केल्या जाणार आहेत. या शेतीशाळा क्रॉपसॅपच्या कामकाजाशी संलग्न केल्या जातील. त्यामुळे प्रत्येक दोन गावे मिळून एक कृषिमित्र यंदा शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. शेतीशाळेची सुरवात कोकणातील भात शेतीपासून केली जाण्याची शक्यता आहे. कृषी सचिवांनी राज्यातील क्रॉपसॅपच्या कामाचा आढावा घेताना कपाशीवरील बोंडअळी, उसातील हुमणी व मक्यातील फॉल अर्ली वर्मवर लक्ष ठेवण्याचे सूचित केले. कीडरोगांचा प्रतिकार करण्यासाठी कृषी खात्याने आपल्या कर्मचाऱ्यांसोबत शेतकरी, कंपन्यांचे प्रतिनिधी आणि शास्त्रज्ञांना सोबत घेऊन नियोजन करावे, असेही या वेळी निश्चित करण्यात आले.  

या वेळी कृषी उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक करंजकर, कृषी संचालक विजयकुमार इंगळे, प्रल्हादराव पोकळे, विजयकुमार घावटे, अनिल बनसोडे, कैलास मोते, उदय देशमुख उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...
वानच्या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्यांचाअकोला : शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेल्या...
विमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्यासोलापूर ः पीकविम्याच्या पैशाबाबत सातत्याने...
मक्यावरील लष्करी अळीच्या प्राथमिक...नागपूर : राज्यातील मका पिकावर आलेल्या अमेरिकन...
कृषी विद्यापीठांच्या संशोधन, विकासासाठी...मुंबई ः कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी...
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के...कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे : बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार...
जळगावात वांगी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१८...
तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये, की...सोलापूर ः ‘‘मी घरच्यांना सांगून आलो आहे, आता...
मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे...औरंगाबाद : वॉटर ग्रिड, गोदावरीच्या तुटीच्या...
साताऱ्यातील धरणांमध्ये ९८ टक्‍क्‍यांवर...सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
नियोजनशून्य कारभारामुळे ६० टक्केच निधी...मुंबई ः भाजप-शिवसेना युती सरकारची पाच वर्षांतील...