बीडमध्ये पावणेआठ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बीड  : जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात ७ लाख ८५ हजार हेक्‍टरवर खरिपातील विविध पिकांची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ७ लाख ६० हजार हेक्‍टर असून गतवर्षीच्या (२०१८-१९) खरीप हंगामात ७ लाख ८० हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली होती. 

खरिपाच्या प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत जिल्हा स्तरावरून खते व बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या सूत्रानुसार बीड जिल्ह्यात येत्या खरीप हंगामासाठी प्रस्तावित ७ लाख ८५ हजार हेक्‍टर क्षेत्राकरिता ६९ हजार क्‍विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. त्यामध्ये ४१ हजार क्‍विंटल बियाण्यांचे आवंटण महाबीजचे असणार आहे. 

जिल्ह्यात बीटी कपाशी लागवडीखालील क्षेत्र ३ लाख ६२ हजार हेक्‍टरवर प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी १४ लाख ४७ हजार कपाशी बियाणे पाकिटांची गरज भासणार आहे. २०१८-१९ च्या खरीप हंगामात बीड जिल्ह्यात १ लाख ४४ हजार टन रासायनिक खतांचा वापर झाला होता. त्या तुलनेत येत्या हंगामासाठी रासायनिक खतांचे १ लाख ४४ हजार टन आवंटन मंजूर करण्यात आले आहे. मार्च २०१९ अखेर जिल्ह्यात ३३ हजार टन रासायनिक खते शिल्लक आहे.  जिल्ह्यासाठी ४७ हजार टन युरिया, १५ हजार टन डीएपी, ४ हजार टन एमओपी, ६५ हजार टन एनपीके, १३ हजार टन एसएसपी रासायनिक खते उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. 

गुणनियंत्रणाच्या दृष्टीने खबरदारी म्हणून जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात १७१० बियाणे विक्रेते तर १७२४ खत विक्रेते असून कीटकनाशकांचे जवळपास १३३७ विक्रेते आहेत. जिल्ह्यात ३४ निरीक्षक असून त्यांना बियाणे, खते व कीटकनाशक नमुने तपासणीचा लक्षांक देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  

६८४ शेतीशाळांचे नियोजन शेतकऱ्यांसाठी येत्या खरीप हंगामात शेती शाळांचे नियोजन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात ६८४ शेतीशाळांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून ३७५, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून २७६ व आत्माच्या माध्यमातून ३३ शेतीशाळा घेण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com