नांदेड जिल्ह्याला एक लाख क्विंटल बियाण्यांची गरज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड : नांदेड जिल्ह्यात २०१९-२० मधील खरीप हंगामामध्ये ८ लाख २ हजार ९०० हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. नियोजित क्षेत्रावर विविध पिकांच्या पेरणीसाठी १ लाख ९ हजार ४४० क्विंटल बियाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे आणि रासायनिक खतांचा पुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. येत्या खरीप हंगामासाठी २ लाख २६ हजार ६६३ टन रासायनिक खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. गतवर्षीचा ५० हजार ५२७ टन खतसाठा शिल्लक आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी संतोष नादरे यांनी माहिती दिली.

असे असेल पेरणी क्षेत्र नांदेड जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात ८ लाख २ हजार ९०० हेक्टरवर पेरणी होईल असे गृहित धरण्यात आले आहे. प्रस्तावित पेरणी क्षेत्रामध्ये ज्वारी ७५ हजार १००, बाजरी ५०, मका १ हजार, भात १ हजार १००, तूर ६५ हजार ८०, मूग २८ हजार, उडीद ३६ हजार, भुईमूग ५०, सूर्यफूल ५००, तीळ ७००, सोयाबीन ३ लाख ४८ हजार, कापूस २ लाख ४० हजार अन्य पिके ६ हजार ६०० हेक्टरचा समावेश आहे.

प्रस्तावित पेरणी क्षेत्रानुसार बियाणे बदलातील दरानुसार यंदा एकूण १ लाख ९ हजार ४४० क्विंटल बियाण्याची गरज आहे. त्यासाठी सार्वजनिक बियाणे उत्पादक कंपन्याकडे (महाबीज) ६७ हजार १२० आणि खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे ४० हजार ५९० क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. मागणी करण्यात आलेल्या बियाण्यांमध्ये ज्वारी ५ हजार ५१५, बाजरी १ क्विंटल २५ किलो, भात १८८, तूर ३ हजार ६५१, मूग १ हजार ५५४, उडीद १ हजार ९९८, मका ५२२, भुईमूग १९ क्विंटल ५० किलो, सूर्यफूल ५० किलो, तीळ १० क्विंटल ५ किलो, सोयाबीन ८५ हजार २६० अन्य पिके १ हाजर ९८० क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे.

दोन लाख ७७ हजार टन खते होतील उपलब्ध येत्या खरीप हंगामासाठी २ लाख ५४ हजार ६०० टन खतांची मागणी करण्यात आली होती. परंतु २ लाख २६ हजार ६६३ टन खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये युरिया ७६ हजार ३९१ टन, डिएपी ३५ हजार ९३१ टन, पोटॅश १९ हजार ८३१ टन, सुपर फाॅस्फेट ३६ हजार ७५९ टन, संयुक्त खते (एनपीके) ५७ हजार ७५१ टन खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. गतवर्षीचा ५० हजार ५९७ टन खतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे खरिपामध्ये एकूण २ लाख ७७ हजार ६६० टन खतसाठा उपलब्ध रहील, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com