पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल बियाण्यांची मागणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड महिन्याचा कालावधी बाकी राहिला आहे. त्यामुळे पुणे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने खरिपाची तयारी सुरू केली आहे. या कार्यालयाकडून जिल्ह्यासाठी कृषी आयुक्तालयाकडे सुमारे २६ हजार ५७३ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. कृषी आयुक्तलयाकडून मंजुरी दिल्यानंतर बियाण्यांचा पुरवठा केला जाणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

यंदा हवामान विभागाने पावसाचा पहिल्या टप्प्यातील अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये ९६ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा आहे. जूनच्या पंधरवड्यात चांगला पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना पेरणी करता येणार आहे. त्यासाठी खते, बियाण्यांची अडचण भासू नये म्हणून कृषी विभागाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.  पुणे जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांचे सरासरी क्षेत्र दोन लाख ८८ हजार २३७ हेक्टर आहे. त्यापैकी एक लाख ८७ हजार ३०० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. मागील तीन वर्षांत जिल्ह्यात बियाण्यांची कमी अधिक प्रमाणात विक्री झाली आहे. यात २०१६ मध्ये २२ हजार ७८३ क्विंटल, २०१७ मध्ये २२ हजार ९९७ क्विंटल, २०१८ मध्ये १८ हजार २४९ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. सरासरी २१ हजार ३४३ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. 

यंदा चांगल्या पावसामुळे खरिपाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज गृहीत धरून कृषी विभागाने २६ हजार ५७३ क्विटंल बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. यामध्ये खासगी कंपन्यांकडून ११ हजार २०४ तर महाबीज व राष्ट्रीय बीज निगम विभागाकडून १५ हजार ३६९ क्विटल बियाण्यांचा पुरवठा अपेक्षित असून, यात महाबीजकडून १४ हजार ८४२ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा अपेक्षित आहे.   यंदा खरीप हंगामासाठी मागणी केलेल्या बियाण्यांमध्ये संकरित ज्वारी, संकरित बाजरी, सुधारित बाजरी, भात, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, वाटाणा, धैंचा, ताग आदी पिकांच्या बियाण्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात भाताची मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाने १३ हजार क्विंटल भात बियाण्याची मागणी नोंदविली आहे. त्यानंतर सोयाबीनच्या क्षेत्रातही वाढ होण्याचा अंदाज असल्याने सहा हजार १९१ क्विंटल सोयाबीन बियाण्यांची मागणी केली आहे.     पीकनिहाय बियाण्यांची मागणी (क्विटंल)  खरीप ज्वारी ७७, संकरित बाजरी १२९७, सुधारित बाजरी ४३२, भात १३,०००, मका १८८८, तूर ११८, मूग २७८, उडीद ११२, भुईमूग १२६५, तीळ १, सूर्यफूल ४, सोयाबीन ६१९१, वाटाणा ७१०, धैंचा ६००, ताग ६००. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com