agriculture news in marathi, kharip season planning, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल बियाण्यांची मागणी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 एप्रिल 2019

पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड महिन्याचा कालावधी बाकी राहिला आहे. त्यामुळे पुणे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने खरिपाची तयारी सुरू केली आहे. या कार्यालयाकडून जिल्ह्यासाठी कृषी आयुक्तालयाकडे सुमारे २६ हजार ५७३ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. कृषी आयुक्तलयाकडून मंजुरी दिल्यानंतर बियाण्यांचा पुरवठा केला जाणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड महिन्याचा कालावधी बाकी राहिला आहे. त्यामुळे पुणे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने खरिपाची तयारी सुरू केली आहे. या कार्यालयाकडून जिल्ह्यासाठी कृषी आयुक्तालयाकडे सुमारे २६ हजार ५७३ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. कृषी आयुक्तलयाकडून मंजुरी दिल्यानंतर बियाण्यांचा पुरवठा केला जाणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

यंदा हवामान विभागाने पावसाचा पहिल्या टप्प्यातील अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये ९६ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा आहे. जूनच्या पंधरवड्यात चांगला पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना पेरणी करता येणार आहे. त्यासाठी खते, बियाण्यांची अडचण भासू नये म्हणून कृषी विभागाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. 
पुणे जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांचे सरासरी क्षेत्र दोन लाख ८८ हजार २३७ हेक्टर आहे. त्यापैकी एक लाख ८७ हजार ३०० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. मागील तीन वर्षांत जिल्ह्यात बियाण्यांची कमी अधिक प्रमाणात विक्री झाली आहे. यात २०१६ मध्ये २२ हजार ७८३ क्विंटल, २०१७ मध्ये २२ हजार ९९७ क्विंटल, २०१८ मध्ये १८ हजार २४९ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. सरासरी २१ हजार ३४३ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. 

यंदा चांगल्या पावसामुळे खरिपाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज गृहीत धरून कृषी विभागाने २६ हजार ५७३ क्विटंल बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. यामध्ये खासगी कंपन्यांकडून ११ हजार २०४ तर महाबीज व राष्ट्रीय बीज निगम विभागाकडून १५ हजार ३६९ क्विटल बियाण्यांचा पुरवठा अपेक्षित असून, यात महाबीजकडून १४ हजार ८४२ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा अपेक्षित आहे.  
यंदा खरीप हंगामासाठी मागणी केलेल्या बियाण्यांमध्ये संकरित ज्वारी, संकरित बाजरी, सुधारित बाजरी, भात, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, वाटाणा, धैंचा, ताग आदी पिकांच्या बियाण्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात भाताची मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाने १३ हजार क्विंटल भात बियाण्याची मागणी नोंदविली आहे. त्यानंतर सोयाबीनच्या क्षेत्रातही वाढ होण्याचा अंदाज असल्याने सहा हजार १९१ क्विंटल सोयाबीन बियाण्यांची मागणी केली आहे.  
 
पीकनिहाय बियाण्यांची मागणी (क्विटंल) 
खरीप ज्वारी ७७, संकरित बाजरी १२९७, सुधारित बाजरी ४३२, भात १३,०००, मका १८८८, तूर ११८, मूग २७८, उडीद ११२, भुईमूग १२६५, तीळ १, सूर्यफूल ४, सोयाबीन ६१९१, वाटाणा ७१०, धैंचा ६००, ताग ६००. 

इतर बातम्या
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...