agriculture news in marathi, kharip season planning, yavatmal, maharashtra | Agrowon

यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 एप्रिल 2019

यवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने बियाणे, खतांचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी एक लाख १९ हजार मेट्रिक टन खतांचा वापर केला असून, यंदा एक लाख ९० हजार मेट्रिक टन खतपुरवठ्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

यवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने बियाणे, खतांचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी एक लाख १९ हजार मेट्रिक टन खतांचा वापर केला असून, यंदा एक लाख ९० हजार मेट्रिक टन खतपुरवठ्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

आगामी खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, कृषी विभागाने नियोजन सुरू केले आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी नऊ लाख हेक्‍टरवर पेरणी झाली होती. यंदाही कृषी विभागाने नऊ लाख हेक्‍टरवर खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. कापूस, सोयाबीन व तूर जिल्ह्यातील प्रमुख पिके आहेत. यात कापूस क्षेत्रात वाढ होण्याची शक्‍यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. त्यानुसार नियोजन सुरू आहे.

खरीप हंगामातील पिकांसाठी खत अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यासाठी कृषी विभागाने एक लाख ९० हजार मेट्रिक टन खतांचे नियोजन केले आहे. यात युरिया, डीएपी, एमओपी, मिश्र खते अशा विविध खतांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना हंगामात अडचण येऊ नये म्हणून कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. गेल्या वर्षी एक लाख ९० हजार ४९० मेट्रिक टन खतांचा वापर शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळेच या वेळी जादा मागणी कृषी विभागाने केली आहे. यात युरिया ७५ हजार ५१४, डीएपी २१ हजार, एमओपी नऊ हजार, मिश्रखते ४६ हजार, तर एसएसपीचे ३७ हजार मेट्रिक टनाचे नियोजन करण्यात आले आहे. लवकरच खते जिल्ह्यात दाखल होणार आहे. 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...