औरंगाबाद : खरिपात सात लाख हेक्‍टरवर पेरणी

औरंगाबाद : खरिपात सात लाख हेक्‍टरवर पेरणी
औरंगाबाद : खरिपात सात लाख हेक्‍टरवर पेरणी

औरंगाबाद : येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील ७ लाख ३५ हजार ९२२ हेक्‍टरवर  पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी ७ लाख ३४ हजार ११४ हेक्‍टर क्षेत्र आहे. गत हंगामात ६ लाख ८६ हजार ८०१ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली होती. त्या वेळी खरीप व त्यानंतर रब्बीही हातचा गेल्याने येत्या खरीप हंगामाच्या क्षेत्रात वाढ होण्याचे संकेत कृषी विभागाने दिले. 

खरिपाच्या हंगामपूर्व नियोजनासाठी गुरुवारी (ता. २) औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. औरंगाबाद जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ७ लाख ३४ हजार ११४ हेक्‍टर आहे. गत हंगामात ६ लाख ८६ हजार ८०१ हेक्‍टरवर प्रत्यक्षात खरिपाची पेरणी झाली होती. त्यामध्ये तृणधान्याची २ लाख ४ हजार १८९ हेक्‍टरवर, कडधान्याची ४९ हजार ७०६ हेक्‍टर, तर तेलबियांची २१ हजार १६४  हेक्‍टरवर पेरणी झाली होती. कपाशीची सर्वाधिक ३ लाख ८५ हजार ४०५ हेक्‍टरवर, त्यापाठोपाठ मक्याची १ लाख ७५ हजार ७९३ हेक्‍टरवर, सोयाबीनची १५ हजार ५२ हेक्‍टरवर पेरणी झाली होती. 

मक्याला मिळालेले दर पाहता पुन्हा एकदा किमान दहा हजार हेक्‍टरने त्याचे क्षेत्र वाढेल. ते येत्या खरिपात १ लाख ८५ हजार ५०० हेक्‍टरवर पोचण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. सोयाबीनचे क्षेत्रही किमान एक हजार हेक्‍टरने वाढून १६ हजार ८५० हेक्‍टरवर पोचण्याची आशा आहे. यासोबतच कपाशीचे क्षेत्र किमान २० हजार हेक्‍टरने वाढून ४ लाख ५ हजार ८०० हेक्‍टरवर पोचण्याचा कृषी विभागाला अंदाज आहे. कडधान्यवर्गीय तूर, मूग, उडीद आदीचे क्षेत्रही किमान १५ हजार हेक्‍टरने वाढून ६४ हजार ५० हेक्‍टरवर प्रस्तावित करण्यात आले.

उत्पादन वाढीचा अंदाज 

जिल्ह्याचे खरिपाचे सर्व पिकांचे मिळून सरासरी उत्पादन १३ लाख ६५ हजार ६०६ मेट्रिक टन आहे. गत हंगामात जिल्ह्यात १५ लाख ६५ हजार १११ मेट्रिक टन उत्पादन झाले होते. येत्या खरीप हंगामात या उत्पादनात वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. हे उत्पादन २१ लाख ३६ हजार ५०९ मेट्रिक टन होण्याचा कृषी विभागाला अंदाज आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com