agriculture news in marathi, Kharip showing stops in Sangli district | Agrowon

सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडला
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 जून 2019

टोकणीसाठी सऱ्या तयार केल्यात. पाऊस नाही. त्यात उपसा बंदी केली आहे. त्यामुळे पेरणी केली नाही. पावसाची प्रतीक्षा करतोय. 
- शरद पवार, अहिरवाडी, ता. वाळवा, जि. सांगली.

सांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली, मॉन्सून पाऊस लांबणीवर पडला. त्यामुळे जिल्ह्यातील तीन लाख ४८ हजार ४८९ हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पेरणी रखडली आहे. परिणामी शिवारावर चिंतेचे ढग दाटले आहेत. अन्यथा गेल्या हंगामाप्रमाणे या वेळीदेखील खरीप हंगाम संकटात सापडण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात यंदा वळवाचा पाऊस झालाच नाही. प्रामुख्याने दुष्काळी पट्ट्यात वळवाचा पाऊस होतो. त्यावर या तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामातील पिकांची पेरणी करतात. परंतू पाऊसच झाला नसल्याने शेती पेरणीविना पडून आहे. जून महिना निम्मा झाला. मृग नक्षत्र सुरू होऊन पाच दिवस झाले. केवळ आकाशात ढगच जमा होताहेत, पण पाऊस काही येत नाही. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाला आहे.

शेतकरी जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन, भात, ज्वारी आदी पिकांची पेरणी करतो. या वेळी उन्हाळी पाऊस अजिबात झाला नाही. परिणामी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झालेली नाहीत. तर शेतात उभा असणाऱ्या ऊस पिकाला विजेच्या लपंडावामुळे पाणी देता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी अंदाजे ३ लाख ४८ हजार ४९८ हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी उपलब्ध आहे. यात सर्वाधिक पेरणी सोयाबीनची होती. पलूस तालुक्यात आगाप सोयाबीन पेरले जाते. पावसाअभावी आणि उपसा बंदी असल्याने तालुक्यात सोयाबीनची पेरणीच झाली नाही.  त्यातच पाण्याची खात्री नसल्याने शेतकरी पेरणी करण्यासाठी पुढे आला नाही.

शिराळा तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र भात पिकाचे आहे. या तालुक्यात भाताची पेरणी वैशाखच्या पहिल्या आठवड्यापासून धूळवाफेवर पेरणी केली जाते. मात्र, या हंगामात धूळवाफेवर पेरणी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आठवडाभरात पाऊस बरसला तरच पेरणी होईल, अन्यथा गेल्या हंगामाप्रमाणे या वेळीदेखील खरीप हंगाम संकटात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे.

या पिकांची होते सर्वाधिक पेरणी (क्षेत्र हेक्टरमध्ये)

सोयाबीन ५७१६१
ज्वारी ६०८७३
बाजरी ४३१९३
भात  १३७८९

 

इतर ताज्या घडामोडी
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...
परभणीत वांगी ८०० ते १५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सातारा जिल्हा परिषदेचा १०० कोटींचा...सातारा : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मूळ...
पुण्यात पीकविम्यासाठी शिवसेना रस्त्यावरपुणे ः ‘कोण म्हणतो देणार नाय विमा घेतल्याशिवाय...
पुणे विभागातील कोरडवाहू पट्ट्यात टंचाई...पुणे : विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला १...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गंत खरिपासाठी...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १५ चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील घटलेली चारा छावण्यांची...
अचूक पीक पेरणी अहवाल देणे शक्य नाही ः...बुलडाणा  ः जिल्ह्यातील पीक पेरणीचा...
आडसाली ऊस लागवडीला कोल्हापूर जिल्ह्यात...कोल्हापूर  : जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात...
परभणी कृषी विद्यापीठ उत्पादित अडीच हजार...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...