agriculture news in marathi, Kharip showing stops in Sangli district | Agrowon

सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडला
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 जून 2019

टोकणीसाठी सऱ्या तयार केल्यात. पाऊस नाही. त्यात उपसा बंदी केली आहे. त्यामुळे पेरणी केली नाही. पावसाची प्रतीक्षा करतोय. 
- शरद पवार, अहिरवाडी, ता. वाळवा, जि. सांगली.

सांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली, मॉन्सून पाऊस लांबणीवर पडला. त्यामुळे जिल्ह्यातील तीन लाख ४८ हजार ४८९ हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पेरणी रखडली आहे. परिणामी शिवारावर चिंतेचे ढग दाटले आहेत. अन्यथा गेल्या हंगामाप्रमाणे या वेळीदेखील खरीप हंगाम संकटात सापडण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात यंदा वळवाचा पाऊस झालाच नाही. प्रामुख्याने दुष्काळी पट्ट्यात वळवाचा पाऊस होतो. त्यावर या तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामातील पिकांची पेरणी करतात. परंतू पाऊसच झाला नसल्याने शेती पेरणीविना पडून आहे. जून महिना निम्मा झाला. मृग नक्षत्र सुरू होऊन पाच दिवस झाले. केवळ आकाशात ढगच जमा होताहेत, पण पाऊस काही येत नाही. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाला आहे.

शेतकरी जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन, भात, ज्वारी आदी पिकांची पेरणी करतो. या वेळी उन्हाळी पाऊस अजिबात झाला नाही. परिणामी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झालेली नाहीत. तर शेतात उभा असणाऱ्या ऊस पिकाला विजेच्या लपंडावामुळे पाणी देता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी अंदाजे ३ लाख ४८ हजार ४९८ हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी उपलब्ध आहे. यात सर्वाधिक पेरणी सोयाबीनची होती. पलूस तालुक्यात आगाप सोयाबीन पेरले जाते. पावसाअभावी आणि उपसा बंदी असल्याने तालुक्यात सोयाबीनची पेरणीच झाली नाही.  त्यातच पाण्याची खात्री नसल्याने शेतकरी पेरणी करण्यासाठी पुढे आला नाही.

शिराळा तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र भात पिकाचे आहे. या तालुक्यात भाताची पेरणी वैशाखच्या पहिल्या आठवड्यापासून धूळवाफेवर पेरणी केली जाते. मात्र, या हंगामात धूळवाफेवर पेरणी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आठवडाभरात पाऊस बरसला तरच पेरणी होईल, अन्यथा गेल्या हंगामाप्रमाणे या वेळीदेखील खरीप हंगाम संकटात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे.

या पिकांची होते सर्वाधिक पेरणी (क्षेत्र हेक्टरमध्ये)

सोयाबीन ५७१६१
ज्वारी ६०८७३
बाजरी ४३१९३
भात  १३७८९

 

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...