देशात खरिपाची पेरणी ५८० लाख हेक्टरवर

देशात आत्तापर्यंत खरिपाची ५८० लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. मागील वर्षी ४०२ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा पेरणी क्षेत्रात १७७ लाख हेक्टरची, म्हणेजच ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
sowing
sowing

पुणेः देशात आत्तापर्यंत खरिपाची ५८० लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. मागील वर्षी ४०२ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा पेरणी क्षेत्रात १७७ लाख हेक्टरची, म्हणेजच ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आत्तापर्यंतच्या पेरणीचा विचार करता कडधान्य पिकाची सर्वाधिक १६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पेरणी अहवालातून मिळाली आहे.   यंदा देशात मान्सून दाखल झाल्यानंतर गेल्यावर्षीच्या तुलनेत सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाला. पेरणीला पोषक वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकत्या घेण्यास प्राधान्य दिले. देशात १० जुलैपर्यंत खरिपातील सरासरी क्षेत्रापैकी जवळपास निम्म्याहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. देशात खरिपाचे सरासरी क्षेत्र हे १ हजार ६३ लाख हेक्टर आहे. त्यापैकी आत्तापर्यंत ५८० लाख हेक्टरवर पेरा झाला आहे. तर गेल्या वर्षी १० जुलैपर्यंत ४०२ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती.  खरिपात भाताचे सर्वाधिक ३९६ लाख हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. आत्तापर्यंत देशात भाताची १२०.७७ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी याच काळात झालेल्या पेरणीच्या तुलनेत २६ टक्के अधिक पेरा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात ९५.७३ लाख हेक्टर क्षेत्र भाताखाली होते. कडधान्य पेरणीत यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत १६२ टक्के वाढ झाली आहे. गेल्यावर्षी याच काळात कडधान्याची २४.४९ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा मात्र ६४.२५ लाख हेक्टरवर पेरा आहे. खरीप पेरणी दृष्टिक्षेपात

  • चांगल्या पावसाने पेरणीला वेग
  • गेल्यावर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग
  • कडधान्य पिकांचे क्षेत्र वाढीचा अंदाज
  • आत्तापर्यंत तूर लागवडीत दुपटीने वाढ
  • तेलबिया पिकांची पेरणीलाही वेग
  • कापूस लागवडीतही वाढ
  • ऊस लागवड मात्र जैसे थे
  • सोयाबीन पेरणीला वेग  देशात सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये चांगला पाऊस झाल्याने यंदा सोयाबीन पेरणीने वेग घेतला आहे. देशात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १११.४९ लाख हेक्टर असून आत्तापर्यंत १०१.४६ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीन पेरणीत गेल्यावर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक १८६ टक्के वाढ झाली आहे. क्षेत्राचा विचार करता मध्य प्रदेशात ५१.१७ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. 

    कापूस लागवड ३५ टक्क्यांनी वाढली देशात १० जुलैपर्यंत कापसाची १०४.८२ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. मागील वर्षी याच काळात ७७.७१ लाख हेक्टर खरिपाचा पेरा होता. यंदा कापूस लागवडीत ३५ टक्के वाढ झाली आहे. राज्यनिहाय उडीद लागवड (लाख हेक्टरमध्ये)

    राज्य   पेरणी बदल (टक्के)
    मध्य प्रदेश    ११.४२     ३५१.४ 
    महाराष्ट्र   २.५५  ५९९२
    राजस्थान  ०.९९    २.३४
    उत्तर प्रदेश   २.५५   २६७.१
    इतर २.८८  १८०

      राज्यनिहाय बाजरी लागवड  (लाख हेक्टरमध्ये) (बदल टक्क्यांत) 

    राज्य    २०२०-२१  २०१९-२०  बदल
    गुजरात  ०.७५  ०.६२ २१.१
    हरियाना २.४५ १.८५  ३२.४
    कर्नाटक  ०.८०   ०.४८   ६७.७
    महाराष्ट्र   ४.६५  १.१५ ३०४.५
    राजस्थान १६.५६   १०.७९   ५३.६
    उत्तर प्रदेश १.१७   १.५५  (-) २४.१

    राज्यनिहाय मका लागवड (लाख हेक्टरमध्ये)

    राज्य  २०२०-२१ २०१९-२०   बदल (टक्के)
    बिहार  २.८५   १.९७   ४४.७ 
    छत्तीसगड १.१२   ०.८१    ३९.३ 
    गुजरात १.९०  १.९३ (-)१.२
    हिमाचल प्रदेश  २.९० २.९० 
    जम्मू आणि काश्मीर  १.९०   १.६९  १२.७ 
    झारखंड  १.८३     ०.९१    १०२.० 
    कर्नाटक    ६.६७  ४.२८     ५६.१ 
    मध्य प्रदेश   १०.८४    ९.२७    १६.९
    महाराष्ट्र    ७.२२   २.७२   १६५.७
    ओडिशा १.२८ ०.७७  ६६.५
    पंजाब  १.९८  १.२८  ५४.७
    राजस्थान   ५.८५  ९.३८  (-)३७.६

          राज्यनिहाय ऊस लागवड (लाख हेक्टरमध्ये)

    राज्य  २०२०-२१  २०१९-२० बदल (टक्के)
    आंध्र प्रदेश १.२०   १.२६ (-)४.८
    बिहार  २.६२   २.९६  (-)११.५
    गुजरात   १.७३    १.८३    (-)५.५ 
    कर्नाटक   ५.२८   ५.२५ ०.६
    मध्य प्रदेश १.१२  १.१८ (-)५.१ 
    महाराष्ट्र   ९.६१  ८.४०  १४.४
    तामिळनाडू   १.७१   २.०६   (-)१७.० 
    उत्तर प्रदेश २३.४२ २३.२४   ०.८ 

    राज्यनिहाय खरीप ज्वारीची पेरणी  (लाख हेक्टरमध्ये) (बदल टक्क्यांत)

    राज्य   २०२०-२१ २०१९-२० बदल
    मध्य प्रदेश  ०.८५  ०.५२  ६३.५
    महाराष्ट्र २.१९  ०.८७  १५१.८
    राजस्थान  १.९६  १.९५  ०.९
    उत्तर प्रदेश ०.७२  ०.४८ ५०.४
    इतर   १.७१   १.४२     ८३ 
    एकूण  ७.४१   ५.२४  ४१.५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com