देशात खरिपाचा पेरा ८५५ लाख हेक्टरवर

पेऱणी
पेऱणी

नवी दिल्ली ः देशात यंदा मॉन्सूनने चांगली हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीस प्रारंभ केला. देशात आतापर्यंत ८५५ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही पेरणी १.७ टक्क्यांनी कमी आहे. मागील वर्षी याच काळात ८७० लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाने दिली आहे. यंदा देशात माॅन्सूनने वेळेच्या आधी हजेरी लावली. मात्र नंतरच्या काळात देशातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड पडला. त्याचा परिणाम पिकांच्या पेरणीवर झाला आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यानंतर देशात अनेक ठिकाणी पेरण्यांनी काही प्रमाणात जोर धरला. या काळापर्यंत देशात पेरणी जवळपास १५ टक्क्यांनी माघारली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी पावसाने जोरदार पुनरागमन केले आणि त्यामुळे पेरणी वाढली. आतापर्यंत देशात ८५५ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. मागील वर्षी याच काळात ८७० लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. गेल्या वर्षीपेक्षा यंदाची पेरणी कमी असली, तरीही मागील पाच वर्षांतील सरासरी पेरणीच्या, ८४३ लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे. खरिपातील भात हे महत्त्वाचे पीक आहे. भाताची पेरणीही मागील वर्षीच्या तुलनेत माघारलेलीच आहे. मागील वर्षी या काळात २७४ लाख हेक्टरवर भाताची लागवड झाली होती. यंदा मात्र २६३ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. देशात यंदा बऱ्याच भागात मॉन्सून उशिरा दाखल झाला, तसेच पावसात पडलेला खंड आणि कमी पावसाची हजेरी यामुळे खरीप पेरणी कमी झाली आहे. पेरणी अंतिम टप्प्यात खरीप पेरणीचा कालावधी संपत आला असून, काही पिकांचीच आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर पेरणी करता येईल. या कालावधीनंतर पेरणी केल्यास पिकांच्या उत्पादकतेत घट येण्याची शक्यता आहे, असे कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले. देशातील बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड या राज्यांमध्ये यंदा कमी पाऊस असल्याने येथे कडधान्याची पेरणी कमी झाली आहे. या राज्यांमध्ये इतरही पिकांच्या लागवडीवर पावसाअभावी परिणाम झाला आहे, असे कृषी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

पेरणी वाढण्याची शक्यता बहुतांशी पिकांच्या पेरणीचा कालावधी संपत आला असला, तरीही येत्या काही दिवासांत पाऊस नसलेल्या भागात पावसाचा जोर वाढल्यास पेरणी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने आॅगस्ट महिन्यात ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखीही काही राज्यांमध्ये पेरणी वाढू शकते असा अंदाज, कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. देशातील पीकनिहाय झालेली पेरणी (लाख हेक्टरमध्ये)

पीक २०१८-१९ २०१७-१८
भात २६२ २७४
कडधान्य ११६ १२०
भरडधान्य १५१ १५५
तेलबीया १५८ १४९
ऊस ५१ ५०
कापूस ११० ११४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com