देशात खरिपाचा ६५ टक्के पेरा आटोपला

देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १ हजार ०६३ लाख हेक्टर असून आत्तापर्यंत ६५ टक्के पेरणी झाली आहे. देशातील शेतकऱ्यांनी ६९१ लाख ८२ हजार हेक्टरवरील पेरा उरकला आहे.
sowing
sowing

नवी दिल्लीः देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १ हजार ०६३ लाख हेक्टर असून आत्तापर्यंत ६५ टक्के पेरणी झाली आहे. देशातील शेतकऱ्यांनी ६९१ लाख ८२ हजार हेक्टरवरील पेरा उरकला आहे. मागील वर्षी १७ जुलैपर्यंतच्या लागवडीचा विचार करता यंदा २१ टक्के अधिक लागवड झाली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने प्रसिध्द केलेल्या अहवालातून मिळाली.   देशात यंदा मॉन्सूनने वेळेवर हजेरी लावत चांगला बरसला. त्यामुळे देशातील अनेक भागात पेरणीयोग्य वातावरण तयार झाल्याने पेरा गेल्यावर्षीच्या तुलनेत लवकर आणि वेगाने झाला. त्यामुळे यंदा पेरणीचा आकडा १७ जुलैपर्यंत वाढला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. भाताची आत्तापर्यंत १६८ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून गेल्यावर्षी १४२ लाख हेक्टरवर लागवड होती. कडधान्याचा पेरा यंदा ३२ टक्क्यांनी वाढून ८२ लाख हेक्टरवर झाला आहे. तर, तेलबियांची पेरणी १५५ लाख हेक्टरवर झाली असून मागील वर्षी याच काळात ११० लाख हेक्टरवर तेलबिया पिके होती.  देशात कापसाची ११३ लाख हेक्टरवर लागवड झाली असून मागील वर्षी ९६ लाख हेक्टरवर कापूस होता. उसाची ५१.३० लाख हेक्टरवर लागवड आहे. भरडधान्याचा पेरा १२ टक्क्यांनी वाढून ११५.६० लाख हेक्टरवर पोचला. यंदा पेरणी वेगात सुरु असून येणाऱ्या काळातही लागवडीचा जोर कायम राहील, अशी माहिती सुत्रांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com