agriculture news in Marathi Kharip sowing over 65 percent Maharashtra | Agrowon

देशात खरिपाचा ६५ टक्के पेरा आटोपला

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 जुलै 2020

 देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १ हजार ०६३ लाख हेक्टर असून आत्तापर्यंत ६५ टक्के पेरणी झाली आहे. देशातील शेतकऱ्यांनी ६९१ लाख ८२ हजार हेक्टरवरील पेरा उरकला आहे.

नवी दिल्लीः देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १ हजार ०६३ लाख हेक्टर असून आत्तापर्यंत ६५ टक्के पेरणी झाली आहे. देशातील शेतकऱ्यांनी ६९१ लाख ८२ हजार हेक्टरवरील पेरा उरकला आहे. मागील वर्षी १७ जुलैपर्यंतच्या लागवडीचा विचार करता यंदा २१ टक्के अधिक लागवड झाली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने प्रसिध्द केलेल्या अहवालातून मिळाली.
 

देशात यंदा मॉन्सूनने वेळेवर हजेरी लावत चांगला बरसला. त्यामुळे देशातील अनेक भागात पेरणीयोग्य वातावरण तयार झाल्याने पेरा गेल्यावर्षीच्या तुलनेत लवकर आणि वेगाने झाला. त्यामुळे यंदा पेरणीचा आकडा १७ जुलैपर्यंत वाढला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. भाताची आत्तापर्यंत १६८ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून गेल्यावर्षी १४२ लाख हेक्टरवर लागवड होती. कडधान्याचा पेरा यंदा ३२ टक्क्यांनी वाढून ८२ लाख हेक्टरवर झाला आहे. तर, तेलबियांची पेरणी १५५ लाख हेक्टरवर झाली असून मागील वर्षी याच काळात ११० लाख हेक्टरवर तेलबिया पिके होती. 

देशात कापसाची ११३ लाख हेक्टरवर लागवड झाली असून मागील वर्षी ९६ लाख हेक्टरवर कापूस होता. उसाची ५१.३० लाख हेक्टरवर लागवड आहे. भरडधान्याचा पेरा १२ टक्क्यांनी वाढून ११५.६० लाख हेक्टरवर पोचला. यंदा पेरणी वेगात सुरु असून येणाऱ्या काळातही लागवडीचा जोर कायम राहील, अशी माहिती सुत्रांनी दिली. 


इतर अॅग्रोमनी
तांदळाची विक्रमी निर्यात होणार पुणे: देशात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस...
देशातून ३५ लाख कापूस गाठींची निर्यात...जळगाव ः जगभरात कापूस पिकाला नैसर्गिक फटका बसतच...
भारतातील तेलबियांची परिस्थितीभारतामध्ये तेलबियांची विविधता अधिक असून, जागतिक...
बंगलोर रोझ, कृष्णपुरम वाणाचा दहा हजार...नाशिक : बंगलोर रोझ व कृष्णपुरम छोट्या आकाराच्या...
डाळींच्या दरात दहा टक्के वाढ मुंबई : पालेभाज्या, कांदा, बटाटा यांसह आता...
जागतिक कापूस उत्पादन घटणार; ...जळगाव ः जागतिक कापूस उत्पादन नव्या म्हणजेच २०२०-...
गरज कांदा उत्पादक कंपन्यांची...मध्यमवर्गीय  ग्राहक आणि  उत्पादक शेतकरी...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
खरिपाचा पेरा सरासरी क्षेत्राच्याही पुढेनवी दिल्लीः कोरना देशात यंदा पाऊसमान चांगले...
फुलशेतीला सजावट व्यवसायाची साथकवठेपिरान (जि. सांगली) येथील अत्यल्पभूधारक अकबर...
हापूस आंब्यासाठी नव्या बाजारपेठांची गरजपोर्तुगिजांच्या काळात मुंबईच्या बाजारपेठेत हापूस...
ब्राझीलचे साखर उत्पादन वाढण्याचा अंदाजकोल्हापूर: गेल्या वर्षी इथेनॉल उत्पादनाकडे...
प्रक्रिया, सामूहिक विपणन, थेट...नाशिक: ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू...
खाद्यतेल आयातीवर निर्बंध आणा: सोपा नागपूर : देशातील नागरिकांचे आरोग्य जपण्याकरिता...
मत्स्यपालनाच्या शाश्वततेसाठी योग्य धोरण...जागतिक पातळीवर लोकसंख्या वेगाने वाढत असून,...
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...