पुणे विभागात खरिपाची तेराशे हेक्टरवर पेरणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः गेल्या आठ दिवसांपासून पुणे विभागातील अनेक भागांत पाऊस होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी सुरू केली आहे. सध्या पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांत पेरणीला सुरवात झाली आहे. विभागात खरिपाचे सरासरी क्षेत्र सात लाख ८८ हजार ४८० हेक्टर असून त्यापैकी आतापर्यंत एक हजार ३४३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. येत्या काळात असाच पाऊस राहिल्यास पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे.

विभागातील नगर जिल्ह्यात ९५.०, पुणे जिल्ह्यात ९८.८ तर सोलापूर जिल्ह्यात ६६.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत विभागातील बहुतांशी भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सध्या पुणे आणि सोलापूरमधील शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. निविष्ठा खरेदीसाठी शेतकरी गर्दी करू लागले आहेत.

सध्या नगर जिल्ह्यात खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली आहे. काही ठिकाणचे शेतकरी योग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अकोले तालुक्यात ७६४ हेक्टरवर भात रोपवाटिका तयार झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यात बाजरी, तूर, मूग, मका, भूईमूग व सोयाबीन पिकांच्या पेरणीस अल्पप्रमाणात सुरवात झाली आहे. मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत भात व नाचणी रोपवाटिकेत रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत.

सोलापूरमध्ये खरीप पिकांच्या पेरणीस सुरवात झाली असून बाजरी, मका, उडीद, मूग, तूर, सोयाबीन व सूर्यफूल या पिकांची अल्पप्रमाणात पेरणी झाली आहे. पुणे विभागात झालेली पेरणी (हेक्टर) ः बाजरी १९०, मका २५९, तूर २७३, मूग ३५१, उडीद ७०, भूईमूग १५, सोयाबीन ६०, इतर तेलबिया पिके १९४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com