agriculture news in marathi, kharip sowing status in region, pune, maharashtra | Page 2 ||| Agrowon

पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार हेक्टरवर पेरणी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने झाल्या आहेत. सध्या पुणे विभागात अनेक ठिकाणी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. विभागात खरिपाचे सरासरी क्षेत्र सात लाख ८८ हजार ४९० हेक्टर आहे. मात्र आतापर्यंत नऊ लाख ८० हजार ७८२ हेक्टरवर म्हणजेच १२४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. काही तालुक्यात कमी पाऊस झाल्याने पेरणीचे प्रमाण कमी आहे. पिकांसाठी पावसाची अत्यंत आवश्यकता आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने झाल्या आहेत. सध्या पुणे विभागात अनेक ठिकाणी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. विभागात खरिपाचे सरासरी क्षेत्र सात लाख ८८ हजार ४९० हेक्टर आहे. मात्र आतापर्यंत नऊ लाख ८० हजार ७८२ हेक्टरवर म्हणजेच १२४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. काही तालुक्यात कमी पाऊस झाल्याने पेरणीचे प्रमाण कमी आहे. पिकांसाठी पावसाची अत्यंत आवश्यकता आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

यंदा शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची अपेक्षा होती. मात्र, उशिराने दाखल झालेल्या पावसामुळे विभागात पेरण्या व भात लागवडीदेखील उशिरा सुरू झाल्या. सध्या नगर जिल्ह्यात पीक परिस्थिती सर्वसाधारण असून सोयाबीन, कापूस, मूग, उडीद ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. अकोले तालुक्यात भात पिकाची १५ हजार ४९० हेक्टरवर पुनर्लागवड झाली आहे. बाजरी पीक फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने क्षेत्रीय कर्मचारी भेटी देऊन अळीच्या नियंत्रणासाठी मेळावे, बैठका, चर्चासत्रे घेऊन मार्गदर्शन करीत आहेत. तूर पीक वाढीच्या अवस्थेत असून आंतरमशागतीची कामे चालू आहेत. मूग व उडीद ही पिके काही ठिकाणी फुले लागण्याच्या अवस्थेत आहेत. मूग पिकाची पेरणी उशिराने झाल्याने शेंगा लागण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. कापूस पीक वाढीच्या अवस्थेत असून आंतरमशागतीची कामे चालू आहेत. 

पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांमधील पश्चिम भागात सुमारे ५५ हजार ३८९ हेक्टरवर भाताची पुनर्लागवड झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रोपवाटिकेची लागवड झाल्याने पुनर्लागवडीसुद्धा उशिराने झाल्या आहेत. तर यांत्रिकीकरणाद्वारे सुमारे ३१० एकरांवर भात लागवड झाली आहे. पेरणी झालेली बाजरी व सोयाबीन ही पिके वाढीच्या अवस्थेत आहे. मूग पीक काही ठिकाणी फुलोऱ्यांच्या अवस्थेत आहे. मका पीकवाढीच्या अवस्थेत असून या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. 

सोलापूरमध्ये ज्वारी आणि बाजरी पिकाची वाढ चांगली असून हे पीक फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. तूर पीक वाढीच्या अवस्थेत आहे. उडीद पीक वाढीच्या अवस्थेत असून काही तालुक्यामध्ये फुलोऱ्यांच्या अवस्थेत आहे. जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक ८० हजार ३२६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. बार्शी तालुक्यातही ५६ हजार २८३ हेक्टरवर पेरणी झाली असून दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, माढा, करमाळा, सांगोला या तालुक्यातही चांगली पेरणी झाली आहे. तर उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस या तालुक्यांत कमी पेरणी झाली आहे.  
 

जिल्हानिहाय खरीप पेरणी स्थिती (हेक्टर)
जिल्हा सरासरी क्षेत्र झालेली पेरणी टक्के
नगर ४,७८, ६४० ५,५७,१०७ ११६
पुणे २,३०,८३० १,६६,४८१ ७२
सोलापूर ७९,०२० २,५७,१९४ ३२५
एकूण ७,८८,४९० ९,८०,७८२  १२४

 


इतर ताज्या घडामोडी
कोरोनाची स्थिती गंभीर; सरकारला सहकार्य...मुंबई ः कोरोनाची राज्यातील गंभीर व भयावह स्थिती...
वाझेप्रकरणी माझी चौकशी करा ः अजित पवारपंढरपूर, जि. सोलापूर : सचिन वाझे प्रकरणात माजी...
गृहनिर्माण संस्था ग्राहक ते कृषिपर्यटन...कृषी पर्यटन म्हणजे ग्रामीण भागातील शेती...
बाजरीच्या कणसात भरले अल्प प्रमाणात दाणेबुलडाणा : शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांची वाट बदलून...
सांगली बाजार समितीवर प्रशासक की मुदतवाढसांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक...
गिरणा धरणातून सुटले उन्हाळी आवर्तनजळगाव : गिरणा पट्ट्यात उष्णतेमुळे वाढती टंचाई...
जीवनावश्यक आस्थापनांनाही नाशिकमध्ये...नाशिक : कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात...
हवामानाच्या १२० वर्षांतील नोंदी आता...पुणे : बदलत्या हवामानाच्या काळात भारतीय हवामान...
सिंधुदुर्गात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस सिंधुदुर्गनगरी ः सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही...
नीरा कालव्‍याचा कारभार दुय्यम...सोलापूर : यंदा कडक उन्हाळा जाणवत आहे. विहिरीत आणि...
‘म्हैसाळ’चा कालवा ओव्हरफ्लोआरग, सांगली : बेडग (ता. मिरज) येथील म्हैसाळ...
अखेर कल्याणराव काळेंचा ‘राष्ट्रवादी’तील...सोलापूर ः भाजप नेते आणि सहकार शिरोमणी साखर...
अमरावती जिल्ह्यात पोकरा योजनेचे अनुदान... अमरावती : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
हरभरा उत्पादकांची शासकीय केंद्राकडे पाठसंग्रामपूर, जि. बुलडाणा : शासनाने हमीभावाने हरभरा...
व्यापारी, अडत्यांकडून शेतकऱ्यांची कोंडीजळगाव : खानदेशात दादर ज्वारीची मळणी पूर्ण झाली...
मका चुकाऱ्याचे १४ कोटी शेतकऱ्यांच्या...औरंगाबाद: जिल्ह्यातील ११ केंद्रांवरून खरेदी...
नियोजन आले लागवडीचेसाधारणपणे ९ ते १० महिने पूर्ण झालेल्या कंदाची...
निकृष्ट चाऱ्याचे मूल्यवर्धननिकृष्ट चाऱ्याचे रूपांतर सकस व असलेल्या...
कांद्याच्या दरात घसरण, शेतकऱ्यांना ‘...विसापूर, जि. सातारा : खटाव तालुक्‍यातील बहुतांश...
बुलडाणा जिल्ह्यात होणार नळ योजनांची...बुलडाणा : उन्हाचे चटके या भागात वाढले असून, पाणी...