agriculture news in marathi, kharip sowing stop due to lack of rain, jalgaon, maharashtra | Agrowon

पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत पेरण्या खोळंबल्या
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जुलै 2019

जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार सलामी दिली. परंतु, नंतर अनेक भागांत ओढ दिली. दर एक किलोमीटरनंतर पावसाचे प्रमाण वेगळे असून, अनेक शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. परिणामी, खानदेशातील सुमारे २५ टक्के क्षेत्र नापेर राहीले आहे. तर टॅंकरची संख्याही फारशी कमी झालेली नाही. 

जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार सलामी दिली. परंतु, नंतर अनेक भागांत ओढ दिली. दर एक किलोमीटरनंतर पावसाचे प्रमाण वेगळे असून, अनेक शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. परिणामी, खानदेशातील सुमारे २५ टक्के क्षेत्र नापेर राहीले आहे. तर टॅंकरची संख्याही फारशी कमी झालेली नाही. 

जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या २० टक्के, धुळ्यात १७ टक्के आणि नंदुरबारात २४ टक्के पाऊस झाला आहे. धुळ्यात एकूण ९२५ मिलिमीटर, जळगावात ७६५ आणि नंदुरबारात ११०० मिलिमीटर पाऊस पडतो. जूनमध्ये फक्त तीन दिवस पाऊस झाला. जुलैमध्ये पावसाचे पाच दिवस आहेत. खानदेशात एकूण १५ लाख हेक्‍टरवर पेरणी अपेक्षित आहे.

यातील २५ टक्के क्षेत्र नापेर आहे. कारण पावसाने दडी मारली आहे. पूर्वहंगामी कापसाची सुमारे दीड लाख हेक्‍टरवर खानदेशात लागवड झाली आहे. या कापसासह कोरडवाहू कापसाची मिळून आठ लाख हेक्‍टवर लागवड झाली आहे. यापाठोपाठ तृणधान्य, कडधान्य व गळीत धान्य पेरले आहे. पिकांची उगवण बऱ्यापैकी आहे. परंतु, पावसाची गरज सर्वत्र आहे.

मागील आठवडाभरापासून पावसाने ताण दिल्याने खानदेशातील सातपुडा पर्वतालगतची कांदा व केळीची लागवड थांबली आहे. तर गिरणाकाठच्या सुमारे १००० हेक्‍टरवरील लिंबू व मोसंबीच्या बागांना पावसाची नितांत गरज आहे.

पाणीटंचाई देखील कायम आहे. जळगाव जिल्ह्यात १६०, धुळ्यात ७३ आणि नंदुरबारात ७० टॅंकर सुरू आहे. सर्वाधिक ३० टॅंकर साक्री (जि. धुळे) तालुक्‍यात सुरू आहेत. यापाठोपाठ जळगावमधील अमळनेर, भडगाव, धुळ्यातील शिंदखेडा, नंदुरबारमधील नंदुरबार तालुक्‍यात पाणीटंचाईचे संकट अधिक आहे.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...