Agriculture news in marathi; Kharipit in Gadchiroli district Only 60% loan | Agrowon

गडचिरोली जिल्ह्यात खरिपात केवळ ६० टक्‍केच कर्जवाटप

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

गडचिरोली  ः आदिवासी आणि नक्षलप्रवण असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही खरीप कर्जाचे उद्दिष्ट गाठण्यात बॅंकांना अपयश आले. जिल्ह्यात खरीप हंगामात केवळ ६०.३६ टक्‍केच कर्जाचे वाटप झाले. त्यामध्ये राष्ट्रीयकृत बॅंकांचा वाटा अवघा ४०.४० टक्‍के आहे. 

गडचिरोली  ः आदिवासी आणि नक्षलप्रवण असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही खरीप कर्जाचे उद्दिष्ट गाठण्यात बॅंकांना अपयश आले. जिल्ह्यात खरीप हंगामात केवळ ६०.३६ टक्‍केच कर्जाचे वाटप झाले. त्यामध्ये राष्ट्रीयकृत बॅंकांचा वाटा अवघा ४०.४० टक्‍के आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गामुळे अपेक्षित उत्पादकता व उत्पन्न मिळविण्यात शेतकरी अपयशी ठरले आहेत. यावर्षी देखील संततधार पावसाने शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेला. असे असताना राष्ट्रीयकृत बॅंकांची कर्ज वितरणातील उदासीनतादेखील शेतकऱ्यांसाठी मारक ठरली आहे. खरीप हंगामासाठी १५७.७० कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले होते. २३ हजार २५६ शेतकऱ्यांना केवळ ९५ कोटी १९ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. कर्ज वितरणाची ही टक्‍केवारी अवघी ६०.३६ इतकीच आहे. 

जिल्हा सहकारी बॅंकेला ५५ कोटी ७५ लाख रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. त्यांपैकी ५१ कोटी ७९ लाख रुपयांचे कर्जवाटप बॅंकेने करीत कर्ज वितरणात आघाडी घेतली. जिल्हा बॅंकेने १६ हजार ५३ शेतकऱ्यांना कर्ज दिले आहे. राष्ट्रीयकृत बॅंकांना ७७ कोटी ६७ लाखांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. त्यांपैकी ३१ कोटी ७१ लाख रुपयांचे वाटप झाले. हे कर्ज ५३६८ शेतकऱ्यांना देण्यात आले. विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेने १८३५ शेतकऱ्यांना ११ कोटी ६९ लाखांचे कर्जवाटप करीत ५३.६९ टक्‍के उद्दिष्ट गाठले. गेल्यावर्षीच्या कर्जमाफीनंतर यावर्षी कर्जाचे प्रमाण वाढणे अपेक्षित होते. परंतु ते कमी झाले. 

दरम्यान, बॅंकांच्या उदासिनतेमुळे शेतकऱ्यांनी देखील बॅंकांच्या कर्जाकडे पाठ फिरवीत खासगी कर्जासाठी धाव घेतल्याचे चित्र यावर्षी होते. खरीप कर्जवितरणात बॅंका पिछाडल्या असतानाच रब्बी हंगामाकरिता २३ कोटी १८ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. बॅंका हे उद्दिष्ट गाठता किंवा नाही हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

दोन बॅंकांचे सात शेतकऱ्यांनाच कर्ज
ऍक्‍सिस व आयसीआयसीआय या खासगी बॅंकांनी तर अवघे १६.१६ टक्‍केच कर्जवाटप कले. त्यांनी अवघ्या सात शेतकऱ्यांना ३२ लाख रुपयांचे कर्ज दिले. 

जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफीपासून वंचित
दोन हजारांवर शेतकरी कर्जमाफीपासून आजही वंचित आहेत. जिल्ह्यात ४० हजार ४०० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले होते. त्यांपैकी ३५ हजार ३३१ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून उर्वरित शेतकरी आजही प्रतीक्षेत आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यात `कृषी, उद्योग, ऊर्जा’...पुणे : जिल्ह्याच्या २०२०-२१ च्या प्रारूप वार्षिक...
‘टेंभू’चे आवर्तन पुढील आठवड्यात...सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करा...
भंडारा : केवळ खरेदी केंद्रांवरच मिळतोय...भंडारा : महाविकास आघाडीकडून ५०० रुपयांचे बोनस आणि...
जळगाव जिल्ह्यात शासकीय धान्य खरेदीला...जळगाव : जिल्ह्यातील तीन केंद्रांमध्ये सोयाबीनची व...
सातारा जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामातील कांद्याची...
लातूर विभागात रब्बीत बारा लाख हेक्‍टरवर...लातूर : लातूर कृषी विभागांतर्गत लातूर,...
उद्योगांच्या दबावाने कापूस निर्यात बंदी...पुणे ः कापसाला आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले दर...
गोंदिया : सौरकृषिपंप उभारणीचे कार्यादेश...गोंदिया  ः राज्य शासनाची ‘मुख्यमंत्री...
जाणून घ्या बहुगुणी पळसाबद्दल..!शास्त्रीय नावः ब्युटीया मोनोस्पर्मा वनस्पतीचे...
औरंगाबादेत कांदा १००० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तापावर गुणकारी गुळवेलजळजळ होणे, बारीक ताप येणे, उष्णता वाढणे या...
सुधारित पद्धतीने करा हळद काढणीसर्वसाधारणपणे जातीपरत्वे हळद काढण्यास ७ ते ९...
अंजीर-सिताफळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ...पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या ...
तोलाई मजुरीसाठी सांगली बाजार समितीच्या...सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तोलाई...
परभणी जिल्ह्यात सिंचनाची ५० कोटींवर...परभणी : जिल्ह्यातील लघू, मध्यम, मोठ्या...
खानदेशात रब्बी ज्वारी, मक्यावर लष्करी...जळगाव : खानदेशात खरिपात शेतकऱ्यांना फटका बसलेला...
परभणीत गाजर ८०० ते १५०० रुपये...परभणी  : येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत साडेआठ...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड या तीन...
अमरावती विभागात सहा लाख ८३ हजार शेतकरी...अमरावती ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
एम्प्रेस गार्डनच्या पुष्पप्रदर्शनाला...पुणे ः एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्या वतीने आयोजित...