Agriculture news in marathi Khaswadi flower producers lost millions rupees every day | Agrowon

खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज लाखोंचा फटका

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 मार्च 2020

खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा फुलाला हंगामातील उच्चांकी दर मिळण्याऐवजी ‘कोरोना’ने जरबेरा शेतीचे वाटोळे केले आहे. खामसवाडीतील वीस पॉलिहाऊस मधील शेतकरी दररोज एक ते दोन लाख रुपयांची फुले तोडून फेकून देत असल्याची माहिती  जरबेरा उत्पादक शेतकरी अनंत चव्हाण व अमोल रोहिले यांनी दिली.

खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा फुलाला हंगामातील उच्चांकी दर मिळण्याऐवजी ‘कोरोना’ने जरबेरा शेतीचे वाटोळे केले आहे. खामसवाडीतील वीस पॉलिहाऊस मधील शेतकरी दररोज एक ते दोन लाख रुपयांची फुले तोडून फेकून देत असल्याची माहिती  जरबेरा उत्पादक शेतकरी अनंत चव्हाण व अमोल रोहिले यांनी दिली.

खामसवाडी येथे पॉलिहाऊसमधे जरबेरा फुलाचे उत्पादन घेणारे वीस ते बावीस शेतकरी आहेत. दहा गुंठ्यापासून तीस गुंठ्यांपर्यंत जरबेराचे पॉलिहाऊस आहेत. दरवर्षी लग्नसराईत पंधरा मार्चपासून जरबेरा फुलांना चांगला भाव येतो. दोन रुपयांपासून दहा ते बारा रुपयांपर्यंत एका फुलाला दर मिळतो. या दोन महिन्यांतच जरबेराचे मुबलक पैसे शेतकऱ्यांना मिळत असतात. 

नेमके याच काळात जगासह भारतात ‘कोरोना’ने धुमाकूळ घातल्यामुळे फुलाची मागणी बंद झाली. व्यापारी घेईना, वाहतूक बंद आहे, लग्नसराई थांबली आहे, एकट्या खामसवाडीतून रोज शंभर बॉक्स जरबेरा फुलाचे जात होते. एका बॉक्समध्ये पाचशे फुले असतात. त्याचे किमान दोन रुपये फुलाप्रमाणे धरले तर दररोज एक लाख रुपयाची फुले खामसवाडीत शेतकरी ‘कोरोना’मुळे तोडून टाकून देत असल्याचे जरबेरा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. 

...तर कर्जाचा बोजा कमी झाला असता
भाव तेजीत आहेत, दहा ते बारा रुपयांपर्यंत भाव मिळाला असता. या भाववाडीच्या काळात उभारी मिळाली असती. पॉलिहाऊससाठी घेतलेल्या कर्जाचा बोजा कमी झाला असता. परंतु ‘कोरोना’मुळे ऐन लग्नसराईत जरबेरापासून मिळणाऱ्या तीन ते चार लाख रूपयाला प्रत्येक शेतकऱ्याला मुकावे लागणार असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत .
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...