खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज लाखोंचा फटका

खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा फुलाला हंगामातील उच्चांकी दर मिळण्याऐवजी ‘कोरोना’ने जरबेरा शेतीचे वाटोळे केले आहे. खामसवाडीतील वीस पॉलिहाऊस मधील शेतकरी दररोज एक ते दोन लाख रुपयांची फुले तोडून फेकून देत असल्याची माहिती जरबेरा उत्पादक शेतकरी अनंत चव्हाण व अमोल रोहिले यांनी दिली.
Khaswadi flower producers lost millions rupees every day

खामसवाडी येथे पॉलिहाऊसमधे जरबेरा फुलाचे उत्पादन घेणारे वीस ते बावीस शेतकरी आहेत. दहा गुंठ्यापासून तीस गुंठ्यांपर्यंत जरबेराचे पॉलिहाऊस आहेत. दरवर्षी लग्नसराईत पंधरा मार्चपासून जरबेरा फुलांना चांगला भाव येतो. दोन रुपयांपासून दहा ते बारा रुपयांपर्यंत एका फुलाला दर मिळतो. या दोन महिन्यांतच जरबेराचे मुबलक पैसे शेतकऱ्यांना मिळत असतात. 

नेमके याच काळात जगासह भारतात ‘कोरोना’ने धुमाकूळ घातल्यामुळे फुलाची मागणी बंद झाली. व्यापारी घेईना, वाहतूक बंद आहे, लग्नसराई थांबली आहे, एकट्या खामसवाडीतून रोज शंभर बॉक्स जरबेरा फुलाचे जात होते. एका बॉक्समध्ये पाचशे फुले असतात. त्याचे किमान दोन रुपये फुलाप्रमाणे धरले तर दररोज एक लाख रुपयाची फुले खामसवाडीत शेतकरी ‘कोरोना’मुळे तोडून टाकून देत असल्याचे जरबेरा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. 

...तर कर्जाचा बोजा कमी झाला असता भाव तेजीत आहेत, दहा ते बारा रुपयांपर्यंत भाव मिळाला असता. या भाववाडीच्या काळात उभारी मिळाली असती. पॉलिहाऊससाठी घेतलेल्या कर्जाचा बोजा कमी झाला असता. परंतु ‘कोरोना’मुळे ऐन लग्नसराईत जरबेरापासून मिळणाऱ्या तीन ते चार लाख रूपयाला प्रत्येक शेतकऱ्याला मुकावे लागणार असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत .  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com