नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
ताज्या घडामोडी
औरंगाबाद जिल्ह्यात गव्हावर आढळला खोडमाशीचा प्रादुर्भाव
औरंगाबाद : जिल्ह्यातील गव्हाच्या पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. राष्र्टीय कृषी संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी देवगाव (ता. पैठण) येथे गहू पिकाची पाहणी केली. त्या वेळी त्यांना गव्हावर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आला.
खरीप हातचा गेल्यांनतर शेतकऱ्यांच्या सर्व आशा रब्बीवर आहेत. परंतु बहुतांश पिकांचा पेरणीचा कालावधी निघून गेला. त्यामुळे रब्बीतूनही फारसे काही हाती लागेल, अशी स्थिती नाही. औरंगाबाद जिल्ह्यात यंदा हरभरा, मका आदी पिकांसोबतच गव्हाचा पेराही वाढला आहे.

औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत जवळपास ५३ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली. या पेरणी झालेल्या गव्हाच्या पिकावरही लष्करी अळीचे आक्रमण झाले, की काय अशी भीती शेतकऱ्यांना होती. त्यामुळे मंगळवारी (ता. १०) औरंगाबाद येथील संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एस. बी. पवार यांच्या नेतृत्वात कीटकशास्त्रज्ञ डॉ. एन. आर. पतंगे, रामेश्वर ठोंबरे, तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते, मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत नरके आदींनी पैठण तालुक्यातील देवगाव येथील पिकांची पाहणी केली.
पीक पाहणीवेळी गोरखनाथ ढाकणे यांच्या शेतातील गव्हावर मोठ्या प्रमाणात खोडमाशीचा प्रादूर्भाव आढळून आला.
निदर्शनास आलेल्या खोडमाशीच्या प्रादुर्भावासाठी तज्ज्ञांनी उपाय सुचविले. इतरही ठिकाणीही अशाप्रकारचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती प्राप्त झाली. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सुचविलेले उपाय केल्यास खोडमाशीवर नियंत्रण मिळविणे शक्य आहे, अशी माहिती डॉ. पतंगे यांनी दिली.
शास्त्रज्ञांनी सुचविल्या या उपाययोजना...
खोडमाशीचे व्यवस्थापन करण्यासाठी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करा. शिफारशीनुसार कीटकनाशकांचा वापर करा. सध्याचे वातावरण हे किडीस पोषक आहे. गहू पेरला, पण थंडी त्या प्रमाणात नाही. त्यामुळेही या खोडमाशीचे प्रमाण वाढू शकते, असे डॉ. पतंगे यांनी सांगितले.
- 1 of 1028
- ››