agriculture news in marathi, Kinova crop introduced in maharashtra by farmers companies | Agrowon

दुष्काळी भागात रुजतंय ‘क्विनोआ’ पीक
सूर्यकांत नेटके
रविवार, 6 मे 2018

नगर : राज्यातील शेतकरी कंपनीच्या माध्यमातून अकरा जिल्ह्यांमध्ये ‘क्विनोआ’ हे परदेशी पीक रुजत आहे. यंदा पहिल्यांदाच राज्यभरात चारशे बारा एकर क्षेत्रावर या पिकाची लागवड झाली आहे. राजगिऱ्यासारखे असणाऱ्या या पिकाची काही शेतकऱ्यांनी काढणी केलेली असून, एकरी सात ते दहा क्विंटल उत्पादन मिळाले आहे. साधारण सरासरी दहा हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर शेतकऱ्यांना मिळाला आहे. मात्र, या पिकाला बाजारात स्वतंत्र मार्केट नसून, शेतकरी कंपन्यांनी दिल्लीतील एका ट्रस्टशी खरेदी करार केला अाहे. 

नगर : राज्यातील शेतकरी कंपनीच्या माध्यमातून अकरा जिल्ह्यांमध्ये ‘क्विनोआ’ हे परदेशी पीक रुजत आहे. यंदा पहिल्यांदाच राज्यभरात चारशे बारा एकर क्षेत्रावर या पिकाची लागवड झाली आहे. राजगिऱ्यासारखे असणाऱ्या या पिकाची काही शेतकऱ्यांनी काढणी केलेली असून, एकरी सात ते दहा क्विंटल उत्पादन मिळाले आहे. साधारण सरासरी दहा हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर शेतकऱ्यांना मिळाला आहे. मात्र, या पिकाला बाजारात स्वतंत्र मार्केट नसून, शेतकरी कंपन्यांनी दिल्लीतील एका ट्रस्टशी खरेदी करार केला अाहे. 

चीन, जपान, इटली, ऑस्ट्रेलियात येणाऱ्या क्विनोआ पिकाची यंदा भारतातही लागवड होत आहे. यंदा नगर, उस्मानाबाद, औरंगाबाद, सोलापूर, बुलडाणा, यवतमाळ, जालना, परभणी, धुळे, बीड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये २४ शेतकरी कंपन्यांच्या पुढाकारातून चारशे बारा एकर क्षेत्रावर क्विनोआची लागवड झाली आहे. या उपक्रमासाठी नगर जिल्ह्यामधील वांबोरी (ता. राहुरी) येथील गर्भगिरी शेतकरी कंपनी समन्वयक म्हणून काम करत आहे. 

इतर पिकांच्या तुलनेत कमी खर्चात येणाऱ्या या पिकाला कमी पाणी लागते. एकरी सात ते दहा क्विंटल पर्यंत उत्पादन मिळाले असल्याचे चिंचोडी (ता. नगर) येथील उद्धवराव जगताप या शेतकऱ्यांनी सांगितले. नगर जिल्ह्यात क्विनोआची साठ एकरांवर पेरणी झाली आहे. 

शंभर रुपये किलोनुसार करार
शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सरवतीदेवी मेमोरियल ट्रस्ट या दिल्लीतील संस्थेशी प्रतिकिलो शंभर रुपये या दराने विक्री करार केला आहे. क्विनोआपासून विविध प्रक्रिया पदार्थ तयार केले जातात. क्विनोआपासून ब्रेड, बेबी फूड, सूप, मिश्रधान्य, बिस्किटे, केक आदी उत्पादने तयार केली जातात. या उत्पादनांना देशात व देशाबाहेरही मागणी आहे. करार केलेली संस्था थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून खरेदी करते.

असे आहे क्विनोआ पीक
राजगिऱ्यासारखे दिसणारे आणि त्याच पद्धतीने उत्पादन घेता येणारे क्विनोआ हे पीक प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेतील आहे. रब्बी हंगामातील हे पीक साधारणपणे नव्वद दिवसांत तयार होते. काळी, चुनखडीयुक्त जमीन, मुरमाड जमिनीवर या पिकाची लागवड करता येते. लागवड केलेल्या जमिनीतून निचरा होणे गरजेचे असते. लागवडीसाठी एकरी एक किलो बियाणे लागते. इतर पिकांच्या तुलनेत या पिकाला खर्चही कमी येतो, अशी माहिती प्रा. गंगाधर चिंधे यांनी दिली.

परभणीत क्विनोआची प्रायोगिक लागवड
महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत स्थापन झालेल्या चिकलठाणा (ता. सेलू) येथील जिवाजी महाराज अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून ब्राह्मणगाव, म्हाळसापूर, कुंडी, चिकलठाणा या गावांतील शेतकऱ्यांनी दहा एकरांवर क्विनोआची प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली आहे. क्विनोआ खरेदीसाठी दिल्ली येथील खासगी कंपनीशी करार करण्यात आलेला आहे.

‘‘महाराष्ट्रात पहिल्यांदाच क्विनोआ पिकाची लागवड झालेली आहे. आम्ही शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून राज्यभर चारशे बारा एकरांवर पेरणी केली आहे. हे कमी पाण्याचे पीक असल्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना फायदेशीरच ठरेल.’’
- प्रा. गंगाधर चिंधे, अध्यक्ष, नगर जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनी संघ, नगर

‘‘किनोआ उत्पादनाला खर्चही फारसा लागत नाही. देशासह जगभरात त्यापासून तयार केलेल्या उत्पादनाला मागणी असल्याने दरही चांगला मिळतो. पुढील वर्षापासून अजून क्षेत्रवाढ होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.’’
- भाऊसाहेब बऱ्हाटे, प्रकल्प संचालक, आत्मा, नगर 

इतर अॅग्रो विशेष
महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देशात...नगर ः नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन...
व्यापाऱ्याकडून द्राक्ष उत्पादकांची तीन...नाशिक: ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या...
‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत शेतकरी...मुंबई : शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर...
ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत `...अकोला ः कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा...
जमीन सुपीकता जपत दर्जेदार संत्रा...दर्जेदार संत्रा फळांच्या उत्पादनात सातत्य राखत...
केळीत दोन हंगामात कारले पिकाचा प्रयोगजळगाव जिल्ह्यातील करंज येथील रामदास परभत पाटील...
कृषी विभागाकडून परीक्षा शुल्क परतीसाठी...अमरावती ः परीक्षा शुल्क परतीसाठी पोस्टेज खर्च सात...
सूतगिरण्या तीन दिवस बंद करण्याची वेळजळगाव ः चीन, युरोपातील सूत निर्यात जवळपास ठप्प...
राज्यात अवघा २५ टक्के पाणीसाठापुणे : जुलै महिना संपत आला, तरीही पावसाने...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने उघडीप...
लावलेली वनवृक्षे जगवावी लागतीलनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच...
खजुराची शेती खुणावतेय विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी...
शेळीपालन ते दुग्ध प्रक्रिया ः महिलांनी...नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त...
सरकारला एवढी कसली घाई?विविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या...
एक पाऊल पोषणक्रांतीच्या दिशेनेशे तकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि...
आधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...
मक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...
लष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...
लष्करी अळी नियंत्रणाचे जागतिक प्रयत्नपुणे : स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा म्हणजेच...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे आव्हान...पुणे ः गेल्या हंगामातील दुष्काळाच्या चटक्यानंतर...