मला सातवा वेतन आयोग नको; पण शेतकऱ्यांचे बघा : किरण खैरनार

शेतकरी जगला तरच समाज जगेल. त्याच भावनेतून मी "सातवा वेतन आयोग देण्याआधी शेतकऱ्यांकडे पाहण्याबाबत'' विनंती करणारे पत्र दिले आहे. हे माझे वैयक्तिक आहे. वेतन आयोग मिळावा. पण सध्याच्या परिस्थितीचा विचार करता शेतकऱ्यांना आधार मिळणं फार गरजेचे आहे. - किरण खैरनार, प्राथमिक शिक्षक, समनापूर, ता. संगमनेर, जि. नगर
मला सातवा वेतन आयोग नको; पण शेतकऱ्यांचे बघा : किरण खैरनार
मला सातवा वेतन आयोग नको; पण शेतकऱ्यांचे बघा : किरण खैरनार

नगर ः मी एक शेतकरी कुटुंबातील आहे. वीस वर्षांच्या नोकरीच्या काळात दोन वेतन आयोग मिळालेत. त्यातून मिळणाऱ्या पैशात सर्व गरजा भागवून पगार उरतो. मात्र सातत्याने पडणारा दुष्काळ, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या मला अस्वस्थ करतात. त्यामुळे मला सातवा वेतन आयोग नको, पण आधी शेतकऱ्यांकडे पाहा, अशी विनंती चक्क एका प्राथमिक शिक्षकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन केली आहे. दोन दिवसांपासून हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून राज्यभरात याची चर्चा सुरू आहे. नगर जिल्ह्यातील समनापूर (ता. संगमनेर) येथील जिल्हा परिषद शाळेत किरण खरैनार हे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्याकडे या भागात पाहिले जाते. समाजिक कामांत सातत्याने पुढाकार असलेल्या किरण खैरनार यांनी साधारण पंधरा दिवसांपूर्वी भूमिपुत्र शेतकरी संघटनेमार्फत मुख्यमंत्र्यांना हे पत्र दिले असून ते मीडियावर व्हायरल झाले.खैरनार यांनी दिलेल्या पत्रात शेतकरीप्रती कृतत्रता व्यक्त केली आहे. ‘मी एक शेतकरी कुटुंबातील आहे. वीस वर्षांच्या नोकरीच्या काळात दोन वेतन आयोग मिळालेत. त्यातून मिळणाऱ्या पैशात सर्व गरजा भागवून पगार उरतो. मात्र सातत्याने पडणारा दुष्काळ, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या मला अस्वस्थ करत आहेत. त्यामुळे मला सातवा वेतन आयोग नको, पण शेतकऱ्यांचे बघा. राज्यातील इतर बाबींवर खर्च करताना प्रथम प्राधान्याने शेतकरी कर्जमुक्ती, शेतमालाला दर मिळावा, दुष्काळी मदत देण्याला प्राधान्य द्यावे. एकवेळ वेतन आयोग नाही मिळाला किंवा उशिरा मिळाला तरी चालेल, मात्र रक्ताचे थेंब अश्रूत मिसळून जगण्याची धडपड करणाऱ्या शेतकऱ्यांना जगवलं पाहिजे.'' अशी भावना त्यांनी पत्रात नमूद केली आहे.  खैरनार यांना पत्र वाचून राज्यभरातून फोन येत असून, त्यांच्या भूमिकेचे अनेक शेतकरी, कर्मचारी, अधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील लोकांचे तसेच मानसिकता खचलेल्या शेतकऱ्यांचेही फोन येत असल्याचे खैरनार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com