Agriculture news in marathi Kirtangali villagers give 37 quintal wheat to poor people | Agrowon

कीर्तांगळी ग्रामस्थांकडून गोरगरिबांना ३७ क्विंटल गहू 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 एप्रिल 2020

नाशिक : लॉकडाऊनमुळे सिन्नर तालुक्यातील अडचणीत असलेल्या गोरगरिबांना व हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या कुटुंबियांना ‘युवा मित्र’तर्फे सामाजिक बांधिलकीतून १५ ते २० दिवसांच्या किराण्याचे वाटप करण्याचे काम गेल्या २० दिवसांपासून सुरू आहे. यासाठी अनेक जण मदतीचा हात पुढे करत असून यात कीर्तांगळी येथील ‘संत हरीबाबा पाणी वाटप संस्था’ व गावकऱ्यांकडून तब्बल ३७ क्विंटल गहू जमा करत ‘युवा मित्र’ संस्थेकडे सुपूर्द केला. 

नाशिक : लॉकडाऊनमुळे सिन्नर तालुक्यातील अडचणीत असलेल्या गोरगरिबांना व हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या कुटुंबियांना ‘युवा मित्र’तर्फे सामाजिक बांधिलकीतून १५ ते २० दिवसांच्या किराण्याचे वाटप करण्याचे काम गेल्या २० दिवसांपासून सुरू आहे. यासाठी अनेक जण मदतीचा हात पुढे करत असून यात कीर्तांगळी येथील ‘संत हरीबाबा पाणी वाटप संस्था’ व गावकऱ्यांकडून तब्बल ३७ क्विंटल गहू जमा करत ‘युवा मित्र’ संस्थेकडे सुपूर्द केला. 

पाण्याचे योग्य नियोजन व्हावे यासाठी गावात ‘युवा मित्र’तर्फे पाणी वापर संस्थेची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे येथील गावकऱ्यांचा ‘युवा मित्र’वर मोठा विश्वास निर्माण झाला. याच अनुषंगाने संत हरीबाबा पाणी वापर संस्थेने पुढाकार ग्रामस्थांना ‘युवा मित्र’च्या उपक्रमासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले. 

यावर प्रत्येकाने आपल्या परीने शक्य तितके गहू यासाठी जमा केले. बघताबघता गावातून तब्बल ३७ क्विंटल धान्य जमा झाले. यानंतर हे धान्य गावकऱ्यांनी ट्रॅक्टरमध्ये जमा करुन ‘युवा मित्र’कडे सुपूर्द केले. तसेच धान्य दळल्यानंतर पिठासाठी गोण्यांची व्यवस्था करून दिली. यासाठी कीर्तांगळीचे ग्रामस्थ, संत हरीबाबा पाणी वापर संस्था व शेतकऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले. 

गावात दरवर्षीप्रमाणे अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन होणार होते. मात्र, लॉकडाऊन पुन्हा वाढल्यामुळे सप्ताह रद्द करण्यात आला. परंतु, दरवर्षी यासाठी जमा करण्यात येणारी मदत यावर्षी गरिबांच्या कामाला यावी यासाठी ‘युवा मित्र’च्या या उपक्रमासाठी धान्य देण्याचे ठरविले. ‘युवा मित्र’ने गेल्या २ वर्षात गावात केलेल्या जलसमृद्धीच्या कामामुळे गावकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी भर पडली. त्यामुळे ‘युवा मित्र’वर आमचा मोठा विश्वास आहे. प्रत्येकाने शक्य तितके धान्य जमा करून यात आपला सहभाग नोंदविला. 
- दगू चव्हाणके, अध्यक्ष, संत हरीबाबा पाणी वापर संस्था 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...