Agriculture news in marathi Kisan Credit Card Scheme for Fishermen: MP Raut | Agrowon

मच्छीमारांसाठी किसान क्रेडीट कार्ड योजना ः खासदार राऊत 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 एप्रिल 2020

सिंधुदुर्ग ः शेतकऱ्यांप्रमाणे पांरपरिक मच्छीमार, लहान मच्छीमारांसाठी किसान क्रेडीट कार्ड योजना राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करतानाच कोरोनामुळे आंबा दलालांच्या कचाट्यातून मुक्त झाल्याचे मत खासदार विनायक राऊत यांनी येथे स्पष्ट केले. 

सिंधुदुर्ग ः शेतकऱ्यांप्रमाणे पांरपरिक मच्छीमार, लहान मच्छीमारांसाठी किसान क्रेडीट कार्ड योजना राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करतानाच कोरोनामुळे आंबा दलालांच्या कचाट्यातून मुक्त झाल्याचे मत खासदार विनायक राऊत यांनी येथे स्पष्ट केले. 

सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या खासदार श्री. राऊत यांनी कणकवली येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री उदय सांमत, आमदार वैभव नाईक, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सांवत, संदेश पारकर,आदी उपस्थित होते. 

खासदार श्री. राऊत म्हणाले की, मच्छीमारांच्या डिझेल परताव्यासाठी मत्स्य आयुक्तांशी चर्चा झाली आहे. मात्र, मार्चअखेरमुळे डिझेलचा परतावा वितरित करता आला नाही. परंतु एप्रिल अखेरपर्यंत मच्छीमारांना परतावा मिळेल. तसा शब्द मत्स्यआयुक्तांनी आपल्याला दिला आहे. दरम्यान शासनाच्या विविध योजनांचा लाभ पांरपरिक मच्छीमार, लहान मच्छीमारांना व्हावा या हेतुने शेतकऱ्यांप्रमाणे किसान क्रेडीट कार्ड योजना राबविण्यात येणार आहे. 

आंब्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आपलेपणा दाखविला. त्यानुसार ऑनलाइन आणि इतर अशी सुमारे १४ हजार १६८ टन आंबा मुंबई, पुणे यासारख्या शहरातील बाजारपेठांमध्ये दाखल झाला आहे. कोरोनामुळे हापूस दलालांच्या विळख्यातून सुटला आहे. यातून एक नवी दिशा आंबा बागायतदारांना मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. काजू बी ला १२० रूपये दर मिळावा, यासाठी जिल्हा बँक प्रयत्नशील असल्याचे सुद्धा श्री. राऊत यांनी स्पष्ट केले.  


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...