किसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या

परभणीजिल्ह्यातील सर्व बॅंकांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान (पी. एम. किसान) योजनेअंतर्गंत लाभार्थी शेतकऱ्यांचे किसान क्रेडीट कार्ड (के. सी. सी.) खाते उघडून त्यांना कर्ज सुविधा उपलब्ध करून द्यावी.
किसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या Of Kisan Credit Card Start an account, give a loan
किसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या Of Kisan Credit Card Start an account, give a loan

परभणी : जिल्ह्यातील सर्व बॅंकांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान (पी. एम. किसान) योजनेअंतर्गंत लाभार्थी शेतकऱ्यांचे किसान क्रेडीट कार्ड (के. सी. सी.) खाते उघडून त्यांना कर्ज सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे यांनी दिले आहेत. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेद्वारे सर्व खातेदार शेतकऱ्यांना उत्पन्न सहाय्य देण्यात येत आहे. किसान क्रेडीट कार्ड योजनेअंतर्गंत बॅंकामार्फत शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात व आवश्यक त्यावेळी कर्ज खात्यामधून सुलभ, सोप्या कार्यपद्धतीने शेती तसेच आनुषंगिक गरजांसाठी भांडवली कर्ज पुरवठा केला जात आहे. क्रेडीट कार्डव्दारे मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी २ लाख रुपया पर्यंतचा कर्जपुरवठा देखील बॅंकामार्फत केला जाणार आहे.परभणी जिल्ह्यात पीएम किसान योजनेचे ३ लाख ८ हजार ७०१ लाभार्थी आहेत. या योजनेअंतर्गत नवीन लाभार्थींना देखील किसान क्रेडीट कार्ड सुविधेचा लाभ देणे आवश्यक राहील. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित शेतकऱ्यांनी कार्यक्षेत्रातील बॅंकेकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह तत्काळ आवश्यक त्या कागदापत्रासह अर्ज करावा.किसान क्रेडिट कार्ड नसलेल्या लाभार्थींना संबंधित बॅंकांमार्फत नवीन किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यात आहे. बॅंकांनी अक्रियाशील क्रेडीट कार्ड असेलल्या शेतकऱ्यांना नवीन कार्ड वाटप करावे. कार्ड वापराबाबत प्रोत्साहित करावे. प्रधान मंत्री सुरक्षा विमा तसेच प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना यामध्ये सहभागी  होण्यास प्रोत्साहित करावे.किसान कार्ड सुविधा घेण्यासाठी बॅंकेकडे संर्पक साधण्यासाठी तसेच कार्ड कार्यान्वित करण्यासाठी लघुसंदेशाव्दारे (एसएमएस) आवाहन करावे. शेतकऱ्यांनी ३ लाख रुपयापर्यंतच्या कर्जाची मुदतीत परतफेड केल्यास शासनाकडून व्याज अनुदान देखील जमा होते.जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत (व्यापारी), ग्रामीण बॅंक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी किसान क्रेडीट कार्ड अंतर्गंत खाते उघडण्याची मोहीम राबवावी असे निर्देश सुरवसे यांनी दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com