Agriculture news in marathi The 'Kisan Ganatantra Parade' will be held in peace | Agrowon

‘किसान गणतंत्र परेड’ शांततेतच होणार

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 जानेवारी 2021

२६ जानेवारी रोजी दिल्लीत काढण्यात येणारी ट्रॅक्टर रॅली शांततेत काढण्यात येईल. या रॅलीला ‘किसान गणतंत्र परेड’ असे नाव देण्यात आले असून, ही परेड शांततेत होईल, अशी माहिती  शेतकरी नेत्यांनी दिली आहे.

नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आणि केंद्र सरकारकडून आंदोलनाकडे करण्यात येत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध म्हणून २६ जानेवारी रोजी दिल्लीत काढण्यात येणारी ट्रॅक्टर रॅली शांततेत काढण्यात येईल. या रॅलीला ‘किसान गणतंत्र परेड’ असे नाव देण्यात आले असून, ही परेड शांततेत होईल, अशी माहिती टिकरी सीमेवर आंदोलन करीत असलेल्या शेतकरी नेत्यांनी दिली आहे.

‘‘दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर रॅली काढण्यास परवानगी दिल्याबद्दल समाधान आहे. उभय पक्षात संघर्ष होण्याची शक्यता आहे.  टिकरी सीमेवर सुमारे अडीच लाख ट्रॅक्टर दाखल झाले आहेत,’’ अशी माहिती आंदोलक शेतकरी ताजिंदर सिंग यांनी दिली. आंदोलक शेतकरी गुरप्रीत म्हणाले, ‘‘ आम्ही ट्रॅक्टर रॅली, रोड शो शांततेत काढू. दिल्ली पोलिस रॅलीच्या मार्गावर हजर असतील. देशभरातून

आलेल्या लाखो शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रॅलीसाठी पंजाब, हरियाना, राजस्थानमधून मोठ्या संख्येने ट्रॅक्टर टिकरी सीमेवर आले आहेत. टिकरी सीमेवर आम्ही ६० दिवसांपासून आंदोलन करीत आहोत.’’ 

दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनेही शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात 
आले आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा...नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी...
खानदेशात वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे...जळगाव : खानदेशात कृषिपंपांची वीजबिल थकबाकी...
खानदेशात मका दर सुधारलेजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...नांदेड : जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगाम २०२०-२१...
‘महाखनिज’मध्ये परराज्यांतील वाळूची...परभणी ः ‘‘राज्य शासनाने परराज्यांतून होणाऱ्या...
पुणे बाजार समितीत पायाभूत सुविधा द्या,...पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार विभागातील...
परभणी : संचालक मंडळाच्या निवडणूकीत...परभणी ः परभणी जिल्हा बॅंक संचालक मंडळाच्या...
सातारा जिल्हा बॅंकेसाठी दोन हजारांवर...सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीसह...
सात वर्षांत हमीभावात ऐतिहासिक वाढ ः...नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांत केंद्र सरकारने...
सोलापुरात शेतकऱ्यांना थेट कर्जवाटप करणारसोलापूर : आर्थिक स्थितीमुळे गेल्या चार-पाच...
पणनची कापूस खरेदी रविवारपासून बंदनागपूर : बाजारात हमीभावापेक्षा कापसाला मिळणारा...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी...सोलापूर : सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या...
शेतीला दिवसा आठ तास वीजपुरवठा करा :...मुंबई : राज्यात वीजेचे दर कमी करण्याचे व...
मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च...मुंबई : ‘‘देशातील अनेक राज्यांमधून त्यांच्या...
शॉर्टसर्किटमुळे आग; अकराशे आंबा, काजू...रत्नागिरी : तालुक्यातील शीळ-सड्यावर वणव्याच्या...
घनकचरा पथदर्शी प्रकल्पांसाठी सिंधुदुर्ग...वैभववाडी : स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या...
अकोल्यात रब्बीसाठी ५४ कोटींचे पीककर्ज...अकोला : यंदाच्या रब्बी हंगमात जिल्ह्यात लागवड...
भाजपला दिला आयारामांनी झटका...सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महालिकेवर गेल्या अडीच...
तंत्र कोथिंबीर लागवडीचे...कोथिंबीर पिकास नियमित ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे...