नागपूर ः रंगीत कापसाच्या उत्पादनाचे स्वप्न संशोधन संस्थांकडून रंगविण्यात आले असले, तरी सं
ताज्या घडामोडी
‘किसान गणतंत्र परेड’ शांततेतच होणार
२६ जानेवारी रोजी दिल्लीत काढण्यात येणारी ट्रॅक्टर रॅली शांततेत काढण्यात येईल. या रॅलीला ‘किसान गणतंत्र परेड’ असे नाव देण्यात आले असून, ही परेड शांततेत होईल, अशी माहिती शेतकरी नेत्यांनी दिली आहे.
नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आणि केंद्र सरकारकडून आंदोलनाकडे करण्यात येत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध म्हणून २६ जानेवारी रोजी दिल्लीत काढण्यात येणारी ट्रॅक्टर रॅली शांततेत काढण्यात येईल. या रॅलीला ‘किसान गणतंत्र परेड’ असे नाव देण्यात आले असून, ही परेड शांततेत होईल, अशी माहिती टिकरी सीमेवर आंदोलन करीत असलेल्या शेतकरी नेत्यांनी दिली आहे.
‘‘दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर रॅली काढण्यास परवानगी दिल्याबद्दल समाधान आहे. उभय पक्षात संघर्ष होण्याची शक्यता आहे. टिकरी सीमेवर सुमारे अडीच लाख ट्रॅक्टर दाखल झाले आहेत,’’ अशी माहिती आंदोलक शेतकरी ताजिंदर सिंग यांनी दिली. आंदोलक शेतकरी गुरप्रीत म्हणाले, ‘‘ आम्ही ट्रॅक्टर रॅली, रोड शो शांततेत काढू. दिल्ली पोलिस रॅलीच्या मार्गावर हजर असतील. देशभरातून
आलेल्या लाखो शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रॅलीसाठी पंजाब, हरियाना, राजस्थानमधून मोठ्या संख्येने ट्रॅक्टर टिकरी सीमेवर आले आहेत. टिकरी सीमेवर आम्ही ६० दिवसांपासून आंदोलन करीत आहोत.’’
दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनेही शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात
आले आहे.