शेतकऱ्यांच्या ‘लाॅँग मार्च’ने दुमदुमली राजधानी

शेतकऱ्यांच्या ‘लाॅँग मार्च’ने दुमदुमली राजधानी
शेतकऱ्यांच्या ‘लाॅँग मार्च’ने दुमदुमली राजधानी

नवी दिल्ली : संपूर्ण कर्जमाफी करा यासह अन्य मागण्यांसाठी देशभरातील २०८ शेतकरी संघटनांनी एकीची मूठ दाखवत राजधानीत लाॅँग मार्च काढून गुरुवारी (ता. २९) केंद्र सरकारला इशारा दिला. बालासाब गुरुद्वारा ते रामलीला मैदान असा दहा किलोमीटरचा मार्ग शेतकऱ्यांच्या घोषणांनी दुमदुमून गेला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा विविध भाषेतील हुंकार एकाच ताकदीने घुमत असल्याचे दृश्‍य ‘लाॅँग मार्च’च्या मार्गवर होते. दरम्यान, रामलीला मैदानात देशभरातून शेतकरी अव्याहतपणे येत असून आज (शुक्रवारी) लाखो शेतकरी मैदानात उपस्थित राहतील, अशी शक्यता आहे. देशभरातील शेतकऱ्यांनी परिसर भरून गेला आहे. आज (शुक्रवारी) संसद घेराव आंदोलन होईल. संसदेला घराओ तसेच शुक्रवारच्या मेळाव्याला पोलिस परवानगी देत नसल्याने ही परवानगी मिळण्यासाठी शेतकरी नेत्यांची सायंकाळपर्यंत धावपळ सुरू होती. अखिल भारतीय किसान समन्वय समितीच्या वतीने आयोजित आंदोलनासाठी येथे पहाटेपासूनच शेतकऱ्यांचे ताफे येण्यास सुरवात झाली. दुपारी साडे अकराच्या सुमारास बालासाब गुरुद्वारापासून लाॅँग मार्च सुरू झाला. विविध देशांतील विविध प्रकारच्या शेतकरी संघटना या मोर्चात सहभागी झाल्या. तरुण शेतकऱ्यांचा सहभाग ही उल्लेखनीय होता. केंद्र सरकारचा निषेध करीत मोर्चा रामलीला मैदानात आला. दुपारनंतर शेतकरी गीतांचा कार्यक्रम झाला. किसान मार्च (video) नवी दिल्लीतील चारही रेल्वे स्थानकातून शेतकरी हातात झेंडे घेऊन मोठ्या अपेक्षेने संसद घेराव आंदोलन सहभागी होण्यासाठी येत आहेत. संपूर्ण कर्जमुक्ती व अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे. या आंदोलनातून शेतकरी सरकारवर दबाव टाकणार असल्याचे खासदार राजू शेट्टी, अजित नवले यांनी सांगितले. संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि उसाला पूर्वीचाच साडेनऊ टक्के हमीभाव या तीन मागण्या प्रमुख देशातील शेतकऱ्यांच्या आहेत. प्रत्येक राज्यातील शेतकरी संघटना यासाठी राज्य पातळीवर सक्रिय होत्या. मात्र, समन्वय समितीचे निमंत्रक व्ही. पी. सिंग व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आदींनी देशातील विविध राज्यांतील संघटनांची मोठ बांधली आहे.  प्रमुख नेते आज उपस्थित संसद घेराओ आंदोलनादरम्यान रामलीला मैदानावर सभा होणार आहे. सभेत विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांबरोबर माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीताराम येचुरी, शरद यादव, दिनेश द्विवेदी, फारूख अब्दुला, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आदींसह विरोधी पक्षातील केंद्रीय पातळीवरील प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com