Agriculture news in marathi 'Kisan Parliament' to be held on 'Jantar Mantar' | Page 2 ||| Agrowon

‘जंतर-मंतर’वर आजपासून होणार ‘किसान संसद’ 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 जुलै 2021

केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांचा निषेध म्हणून आणि हे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी आजपासून (गुरुवारी) जंतर-मंतर येथे ‘किसान संसदे’चे आयोजन करण्यात येणार आहे.

 नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांचा निषेध म्हणून आणि हे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी आजपासून (गुरुवारी) जंतर-मंतर येथे ‘किसान संसदे’चे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी नेते बलबीरसिंग राजेवाल यांनी दिली आहे. बुधवारी (ता. २१) या बाबत शेतकरी नेते आणि दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते. दर दिवशी सुमारे २०० शेतकरी यात सहभागी होतील, अशी माहितीही देण्यात आली. 

बलबीरसिंग राजेवाल म्हणाले, ‘‘किसान संसदेबाबत बुधवारी बैठक झाली. आमची भूमिका आम्ही मांडली, प्रशासनाशी झालेल्या चर्चेनुसार दर दिवशी २०० शेतकऱ्यांचा गट जंतर-मंतर येथे जाईल. या बाबत आणखी एक बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आताच काही सांगू शकत नाही.’’ शेतकरी नेते योगेंद्र यादव म्हणाले, ‘‘शेतकरी युनियनचे नेते आणि दिल्ली पोलिसांशी झालेली चर्चा अर्थपूर्ण आणि सकारात्मक झाली. आज २०० शेतकऱ्यांचा एक गट जंतर-मंतर येथे जाईल. आणि किसान संसद सुरू होईल. ही किसान संसद अंत्यत शांततेत होईल. 

राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे राष्‍ट्रीय अध्यक्ष शिवकुमार काक्का म्हणाले, ‘‘मागील सात वर्षांत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात घेतलेल्या सर्व निर्णयांवर किसान संसदेत चर्चा होईल. दररोज सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत २०० शेतकरी शेतकरी विरोधी निर्णयांवर चर्चा करतील. प्रत्येक शेतकरी संघटना दररोज नव्या पाच शेतकऱ्यांना येथे पाठवेल. त्यांच्याकडे ओळखपत्र, आधार कार्ड असेल. हे सर्वजण पाच बसमधून जंतर-मंतर येथे येथील.’’ 

संसदेला घेराव घालणार नाही 

दिल्ली पोलिसांनी रविवारी होणाऱ्या निदर्शनांना परवानगी नाकारल्यानंतर बलबीरसिंग राजेवाल म्हणाले, ‘‘आज संसदेला घालण्यात येणारा नियोजित घेराव घातला जाणार नाही.’’ शेतकरी दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकरी २६ नोव्हेंबर २०२० पासून निदर्शने करीत आहेत. दरम्यान, सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही अद्याप मतभेद मिटलेले नाहीत.


इतर अॅग्रो विशेष
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...
शेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंडनांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार...
कोकणात पावसाचा जोर कायमपुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाजपुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर...
पाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
सेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा...नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...