नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी किसान रेल्वेचा आधार 

कृषी क्षेत्रात प्रगत असलेल्या नाशिक जिल्ह्यातून पहिली 'किसान रेल्वे' देवळाली(नाशिक) ते दानापूर (बिहार) दरम्यान शुक्रवारपासून (ता.७) सुरू झाली आहे.
railway-parcel
railway-parcel

नाशिक: कृषी क्षेत्रात प्रगत असलेल्या नाशिक जिल्ह्यातून पहिली 'किसान रेल्वे' देवळाली(नाशिक) ते दानापूर (बिहार) दरम्यान शुक्रवारपासून (ता.७) सुरू झाली आहे. पूर्वी मागणी व पुरवठा साखळीत बाजारपेठ, वाहतूक या मुख्य अडचणी होत्या. आता या रेल्वेच्या माध्यमातून नाशवंत शेतमालाची बाजारपेठांपर्यंत वाहतूक सोपी होणार आहे. 

नाशिकच्या कांदा, द्राक्ष, डाळिंब व भाजीपाल्याला तर जळगावच्या केळीला देशभर मागणी असते. दोन्ही जिल्ह्यांत पालेभाज्या, भात आणि डाळिंबाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे विशेषतः नगदी पिकांवर शेतकऱ्यांची आर्थिक गणिते अवलंबून आहेत. कांदा, द्राक्षाच्या जलद वाहतूकीसाठी किसान रेल्वेची ची मागणी होती,ती आता पूर्ण झाली आहे. 

किसान रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व बिहार राज्यातील विविध भाग जोडले जाऊन शेतमालाचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे कृषी उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. देवळाली ते दानापूर हे अंतर १५१९ किलोमीटर इतके आहे. किसान रेल्वे (००१०७) डाउन दर शुक्रवारी सकाळी ११ वाजता देवळाली कॅम्प स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता दानापूरला पोहचेल. तर परतीच्या प्रवासात किसान रेल्वे (००१०८) अप दर रविवारी दुपारी १२ वाजता दानापूर स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ७.४५ वाजता देवळाली कॅम्पला पोहचेल. 

किसान रेल्वेचे वेगळेपण  यामध्ये पार्सल व्हॅन आणि एक लगेज कम ब्रेक व्हॅन असणार आहे. १७ टन क्षमतेचे नावीन्यपूर्ण रेफ्रिजरेटेड कोच जोडण्यात आले आहेत. रेल्वे कोच फॅक्टरी कपूरथ येथे बनविण्यात आले आहेत. त्यांची रचना शीतगृहासारखी असून त्यामध्ये भाजीपाला, फळे, दूध असे नाशवंत घटक ठेवण्यात येणार आहेत.  किसान रेल्वेचे मार्गातील थांबे  नाशिक रोड, मनमाड जंक्शन, जळगाव, भुसावळ जंक्शन, बुरहानपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, माणिकपूर, प्रयागराज, पं.दीनदयाल उपाध्याय जंक्शन आणि बक्सर या स्थानकावर थांबणार आहे. 

किसान रेल्वेचे दरपत्रक(प्रतिटन- रुपये)

अंतर दर
नाशिक रोड/देवळाली ते दानापूर ४,००१ 
मनमाड ते दानापूर ३,८४९
जळगाव ते दानापूर ३,५१३
भुसावळ ते दानापूर ३,४५९
बुरहानपूर ते दानापूर ३,३२३
खंडवा ते दानापूर ३,१४८

हे होणार फायदे 

  • ताजा व नाशवंत शेतमाल बाजारपेठेत वेळेत पोहोचणार 
  • शेतमालाची सुरक्षित वाहतूक होणार 
  • वाहतूक खर्चात बचत होणार 
  • किसान रेल्वेच्या ठळक बाबी: 

  • किसान रेल्वेच्या माध्यमातून फळांमध्ये द्राक्ष,डाळिंब,केळी तर भाजीपाल्यामध्ये कांदा, ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर, शेवगा, हिरवी मिरची यांची वाहतूक सुनिश्चित होणार 
  • या माध्यमातून छोटे शेतकरी व व्यापाऱ्यांची कृषी उत्पादने वाहतुकीची गरज पूर्ण होणार 
  • रेल्वेमार्गातील निश्चित करण्यात आलेल्या स्थानकांवर फळे व भाजीपाला यांची लोडिंग व अन लोडिंग व्यवस्था उपलब्ध 
  • सुरुवातीला आठवड्यातून एकदा ही सुविधा असेल. मात्र प्रतिसाद अनुभवल्यानंतर त्यात बदल केला जाणार आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com