agriculture news in Marathi kisan rath for agricultural produce transportation Maharashtra | Agrowon

शेतमाल वाहतुकीसाठी ‘किसान रथ अॅप’; वाहनधाकर आणि शेतकऱ्यांतील दुवा 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 एप्रिल 2020

लॉकडाऊनच्या काळात शेतमालाची वाहतुक करण्यासाठी मालवाहतुक गाड्यांची माहिती मिळावी यासाठी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ‘किसान रथ’ या मोबाईल ॲपचे अनावरण गुरुवारी (ता.१७) येथे केले.

नवी दिल्लीः लॉकडाऊनच्या काळात शेतमालाची वाहतुक करण्यासाठी मालवाहतुक गाड्यांची माहिती मिळावी यासाठी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ‘किसान रथ’ या मोबाईल ॲपचे अनावरण गुरुवारी (ता.१७) येथे केले. या ॲपच्या माध्यमातून व्यापारी, शेतकऱ्यांना शेतमालाची प्रथामिक आणि दुय्यम पातळीवर वाहतुक सरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

‘किसान रथ’ ॲपची निर्मिती नॅशनल इन्फॉरमॅटीक सेंटरने (एनआयसी) केली आहे. या ॲपच्या माध्यमातून व्यापारी आणि शेतकऱ्यांना वाहतूकीसाठी मालवाहतुक गाड्यांची माहिती उपलब्ध होणार आहे. यात प्राथमिक पातळीवर शेतकऱ्यांच्या बांधावरून मंडी किंवा बाजार समित्या, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या खरेदी केंद्रांवरून आणि गोदामे आदी माल वाहतुकीचा सामवेश आहे. दुय्यम पातळीवर मंडी, बाजार समित्यांपासून राज्या अंतर्गत, राज्या-राज्यांमध्ये, प्रक्रिया केंद्रे, रल्वे स्टेशन, वेअरहाऊस आणि घाऊक व्यापारी आदी माल वाहतुकीचा समावेश आहे. 

यावेळी बोलताना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले, कि लॉकडाऊनच्या काळात शेतीसंबंधीत कामे ठप्प झाली होती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीला सुट दिली त्यामुळे पिकांची काढणी आणि लागवडीची कामे सुरु झाली. आता ‘किसान रथ’ ॲपमुळे शेतमालाची वाहतुक सुरळीत होईल. शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्थांना आपल्या मालाची देशभरात वाटेल तेथे वाटेल त्या वाहनाने वाहतुक करता येणार आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बांधापासून ते बाजार समित्यांपर्यंत आणि बाजार समित्यांपासून देशभरात शेतमालाची वाहतुक करता येणार आहे. 

श्रेणीनुसार वाहतुक शक्य 
‘किसान रथ’ मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतमालाच्या श्रेणीनुसार वाहतुक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अन्नधान्य (तृणधान्य, भरडधान्य, कडधान्य आदी), फळे आणि भाजीपाला, तेलबिया, मसाले, फुले, बांबू, तंतूमय पिके, वन्य उत्पादने नारळ आदी उत्पादनांची वाहतुक सोपी होणार आहे. तसेच व्यापाऱ्यांना नाशिवंत मालाची शीतवाहनाद्वारे वाहतुक करता येईल. 

app Download link :
https://play.google.com/store/apps/details?id=com.velocis.app.kishan.vahan
 


इतर अॅग्रो विशेष
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...
कृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...