पुण्यात विमा कंपनीसमोर किसान सभेचे धरणे आंदोलन

Kisan Sabha agitation in front of insurance company in Pune
Kisan Sabha agitation in front of insurance company in Pune

पुणे ः शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्यास ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करीत पुणे येथे कंपनी कार्यालयासमोर गुरुवारी (ता. १९) शेतकऱ्यांनी किसान सभेच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा आंदोलन सुरू केले आहे.

याविषयी गेल्या महिन्यातही शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर काही शेतकऱ्यांना भरपाईची मदत मिळाली आहे. मात्र, अद्याप अनेक शेतकरी भरपाईपासून दूर राहिल्याने पुन्हा आंदोलनाचा मार्ग शेतकऱ्यांनी निवडला आहे.

बँकेकडून झालेल्या गोंधळामुळे जवळपास ६३ हजार तर सीएससी केंद्राकडून झालेल्या चुकांमुळे १३ हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. 

यात किसान सभेचे बीड जिल्हा समितीचे सदस्य अॅड. अजय बुरांडे, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. नाथा शिंगाडे, जिल्हा सचिव कॉ. मुरलीधर नागरगोजे, पुणे जिल्हा सचिव डॉ. दत्ता डाके, ज्ञानेश्‍वर मोटे, प्रवीण देशमुख, कुमार महाजन, सुभाष डाके, मदन वाघमारे, सुदाम शिंदे यांच्यासह बीड जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले होते.

श्री. बुरांडे म्हणाले, की मार्च २०१९ अखेरपर्यंत मंजूर पीकविमा शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित असताना डिसेंबर महिना उजाडला तरी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मंजूर पीकविमा मिळू शकलेला नाही. यासाठी अखिल भारतीय किसान सभेने सनदशीर मार्गाने संबंधित तहसील, जिल्हाधिकारी, कृषी आयुक्त कार्यालयाचे उंबरे झिजवले आहेत. प्रत्यक्षात मात्र प्रत्येक वेळी आठ दिवसांत, पंधरा दिवसांत विमा मिळेल या आश्वासनाशिवाय शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडू शकले नाही. या कारणाने अखिल भारतीय किसान सभेने पीक विमा मिळावा म्हणून गेल्या महिन्यात मुक्काम सत्याग्रह आंदोलन केले. त्या वेळी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून असे सांगण्यात आले होते की, खरीप २०१८ या हंगामात बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फसवी, खोटी विमा प्रकरणे झाली आहेत. त्यामुळे केंद्र सरकार म्हणजेच आपल्या विभागाने या शेतकऱ्यांची पीकविमा रक्कम रोखण्यासाठी आणि प्रत्येक दावा, अर्ज तपासणी, छाननी करण्याचे निर्देश दिले आहेत. जे लोक या भ्रष्टाचारात निघत आहेत. अशांना कायद्याप्रमाणे शासन व्हायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com