किसान सभेची ८ जानेवारीला रेल आणि रास्ता रोकोची हाक

किसान सभेची ८ जानेवारीला रेल आणि रास्ता रोकोची हाक
किसान सभेची ८ जानेवारीला रेल आणि रास्ता रोकोची हाक

पुणे: नाशवंत शेतीमालाला हमीभावासाठी केंद्र शासनाने धोरण ठरवावे. तसेच शेतकरी आत्महत्या, जमीन हक्क व दुष्काळ प्रश्नी पंतप्रधानांनी दुष्काळी महाराष्‍ट्राचा दौरा करून तातडीने पॅकेज जाहीर करावे. या मागण्यांबरोबरच राज्य आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजना फसव्या असून, एकही योजनेची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने ८ जानेवारी रोजी राज्यात रेल आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे आणि राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी शुक्रवारी (ता. २१) पत्रकार परिषदेमध्ये दिली.   अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य कौन्सिलची बैठक पुण्यात झाली. या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची माहिती डॉ. नवले यांनी दिली.   या वेळी श्री. ढवळे म्हणाले, की नुकत्याच चार राज्यांत झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांचा असंतोषामुळे भाजपाला पराभव पत्कारावा लागला. पराभवाची ही श्रृखंला कायम राहणार असून, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देखील सरकारचा पराभव अटळ आहे. एकीकडे शेतकरीविरोधी धोरणे राबवित असताना २०१९ च्या निवडणुकांसाठी निधी मिळविण्यासाठीच उद्योगांचे कर्ज केंद्र सरकार माफ करत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष्य करत आहे. यामुळे सरकारबाबत शेतकऱ्यांचा असंतोष वाढत असून, २०१९ ला शेतकरी मोदी-शहा यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. 

पत्रकार परिषदेत बोलताना अजित नवले (video)

डॉ. नवले म्हणाले, की राज्यात कांदा, कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून, दुष्काळाची दाहकता वाढत आहे. तर केंद्राच्या चुकीच्या दुष्काळ संहितेमुळे शेकडो गावे दुष्काळाच्या यादीतून अन्यायकारक पद्धतीने वगळण्यात आली आहेत. तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांनी मराठवाड्याचा दौरा करावा व आत्महत्याग्रस्त विभागांसाठी विशेष मदत जाहीर करावी, यासाठी किसान सभेच्या वतीने परभणी येथे राज्यव्यापी दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. या परिषदेत केंद्र शासनाने कांदा, टॉमेटो, बटाटा, भाज्या आदी नाशवंत शेतमालाला हमीभावाच्या संरक्षणासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीदेखील केली जाणार आहे. या वेळी किसान सभेचे पुणे जिल्हाध्यक्ष नाथा शिंगाडे, डॉ. अजित अभ्यंकर, माणिक अवघडे, किसन गुजर आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com