देवस्थान इनाम जमीनप्रकरणी चौकशी करा : किसान सभा

देवस्थान इनाम जमीनप्रकरणी चौकशी करा: किसान सभा
देवस्थान इनाम जमीनप्रकरणी चौकशी करा: किसान सभा

पुणे ः जिल्ह्यातील केसनंद (ता. हवेली) येथील म्हतोबा देवस्थानची जमीन विक्री प्रकरणाचे अपील संबंधित ट्रस्टने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केल्यानंतर सदर जमीन देवस्थान इनाम नाही, असा निर्वाळा दिला. त्यांनी जमीन विक्रीस परवानगी दिली व शासनाचा ४२ कोटींचा नजराणा बुडविला, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. याची उच्चस्तरीय चौकशी होऊन चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने केली आहे. किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, कॉ. आमदार जे. पी. गावीत, कॉ. किसन गुजर, डॉ. अजित नवले, कॉ. डॉ. उदय नारकर, कॉ. उमेश देशमुख यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे, की पुणे जिल्ह्यातील केसनंद (ता. हवेली) येथील म्हतोबा देवस्थानचे व्यवस्थापन करण्यासाठी १८ व्या शतकात साळी कुटुंबाला देण्यात आले होते. पुढे ती जमीन त्याच्या वारसाकडे होती. १९९७ साली संबंधित ट्रस्टने जमीन कराराने सत्संग ब्यासला दिली. त्यांनी पुढे विक्रीसाठी परवानगी मागितली. त्यास नजराणा शुल्क न भरल्याने तत्कालीन अधिकाऱ्यानी परवानगी नाकारली. त्या विरोधात महसूलमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांच्याकडे अपील केले. त्यावर निकाल देत सदर जमीन देवस्थान इनाम नाही असा निर्वाळा देऊन त्यांनी जमीन विक्रीस परवानगी दिली व शासनाचा ४२ कोटींचा नजराणा बुडविला असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. याची उच्चस्तरीय चौकशी होऊन चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई करावी. ‘‘मार्च २०१८ मध्ये किसान सभेच्या नेतृत्वाखाली झालेल्या लाँग मार्चच्या वेळी सरकार बरोबर झालेल्या चर्चेत कायदा करण्याविषयी लेखी आश्वासन दिले होते व ६ महिन्यांची मुदत मागितली होती. ते आश्वासन न पाळल्यामुळे फेब्रुवारी २०१९ मध्ये दुसऱ्यांदा लाँग मार्च सुरू केला. त्या वेळी झालेल्या चर्चेत देवस्थान जमिनीविषयी चालू अधिवेशनात विधेयक आणण्याचे मान्य केले. परंतु, याबाबत शासनाची कोणतीही हालचाल दिसत नाही,’’ असेही किसान सभेने म्हटले आहे.  सरकारने देवस्थान इनाम वर्ग ३ च्या जमिनीविषयी कायदा करावा अन्यथा देवस्थानाऐवजी वर्षा निवासस्थानी दिवा बत्ती करू, असा इशारा किसान सभेने दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com