Agriculture news in marathi Kisan Sabha rally reaches Mumbai wilth thousands of farmers | Agrowon

लाल वादळ मुंबईत धडकले 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 जानेवारी 2021

'राज्यव्यापी नाशिक ते मुंबई वाहन मार्च'  रविवार (ता.२४) सायंकाळी आझाद मैदानावर पोहचला, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी दिली. 

नाशिक : दिल्ली येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला निर्णायकरित्या आणखी व्यापक करण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शनिवार(ता.२३) रोजी 'राज्यव्यापी नाशिक ते मुंबई वाहन मार्च' सुरू झाला. यामध्ये १५ हजार शेतकऱ्यांचा सहभाग असून, रविवार (ता.२४) सायंकाळी आझाद मैदानावर पोहचला, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी दिली. 

नाशिक येथून निघालेल्या वाहन मार्चचा मुक्काम इगतपुरीजवळ घाटनदेवी येथे होता. रविवार (ता.२४) सकाळी ९ वाजता घाटनदेवी येथून हजारो आंदोलकांनी कसारा घाट उतरून मुंबईच्या दिशेने कूच केली.

राज्यभरातील शंभरपेक्षा अधिक संघटनांच्या वतीने संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या झेंड्याखाली आझाद मैदानावर महामुक्काम आंदोलन होणार आहे. राज्यातील ‘अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती’, ‘कामगार संघटना संयुक्त कृती समिती’, ‘जन आंदोलनांची संघर्ष समिती’, ‘नेशन फॉर फार्मर्स’ आणि ‘हम भारत के लोग’ या पाच मंचांनी मिळून संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा तयार केला आहे. मुंबई येथील आझाद मैदान येथे रविवार (ता.२४) महामुक्काम आंदोलन नियोजित आहे. 

या वाहन मार्चमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, जमसंच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, माकपचे आमदार व सीटूचे राज्य सचिव विनोद निकोले, किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसन गुजर, सरचिटणीस डॉ. अजित नवले, सहसचिव सुनील मालुसरे, ‘डीवायएफआय’च्या राज्य सरचिटणीस प्रीती शेखर आणि ‘एसएफआय’च्या राज्य उपाध्यक्ष कविता वरे यांच्यासह हजारो शेतकरी, कामगार, युवक,महिला यांचा सहभाग आहे. इगतपुरी व शहापूर तालुक्यातील सिटू संलग्न असणाऱ्या अनेक कामगारांनी वाहन मार्चचे स्वागत केले. ठाणे जिल्ह्यातील हजारो शेतकरी, कामगार या वाहन मार्चमध्ये सहभागी झाले आहेत. 

आझाद मैदानावर ५० हजार 
आंदोलकांच्या उपस्थितीत होणार सभा 

सोमवारी (ता.२५) रोजी आझाद मैदान येथे सकाळी अकरा वाजता मोठी सभा होणार आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, डावे व लोकशाही पक्ष यांचे प्रमुख नेते आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस, संयुक्त किसान मोर्चाचे प्रमुख नेते माजी खासदार हनन मोल्ला, या सभेस संबोधित करणार आहेत.

राज्यभरातून आझाद मैदानावर ५० हजार जण जमतील. सभेनंतर येथे जमलेले हजारो श्रमिक दुपारी दोन वाजता राज भवनाकडे कूच करतील व प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करतील, अशी माहितीही ढवळे यांनी दिली आहे. 


इतर अॅग्रो विशेष
शेतीमध्येही रंगवितो प्रयोगशीलतेचे धडेपरभणी येथील गांधी विद्यालयामध्ये कला शिक्षक...
विदर्भात तापमान चाळिशीपार पुणे ः उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह कमी होऊ...
पीकविम्यासाठी राज्य नवीन धोरण आणणार :...मुंबई : पंतप्रधान पीकविमा योजना केंद्र शासनाच्या...
अर्थव्यस्थेच्या घसरणीला ‘कृषी’चा टेकूपुणे ः कोरोना विषाणूच्या विळख्याने देशासह...
उशिराचे शहाणपणमुं बई बाजार समितीने शेतीमालाचे संपूर्ण व्यवहार...
नारायणगाव येथे होणार टोमॅटो प्रक्रिया...पुणे : कोरोना संकटामुळे ग्रामीण भागातील...
सेंद्रिय शेतीमालाबाबत सर्वंकष धोरण...सोलापूर ः शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे...
बारामती कृषी महाविद्यालयाला ‘आयसीएआर’ची...पुणे : भारतीय कृषी संशोधन परिषदेने आता देशातील...
धान्यासहित कडब्यासाठी दादर ज्वारी आश्‍...कमी पाणी व अल्प खर्चात सकस धान्य, पशुधनासाठी...
चिकाटीतून नावारूपाला आणला गूळ उद्योगहिंगोली जिल्ह्यातील देवजणा येथील कैलासराव...
शंभर दिवसांनंतरही कृषी कायद्यांना विरोध...नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी...
हळद पिवळे करून जातेयचार वर्षांमध्ये एकदा तरी ‘हळद पिवळे करून जातेय’,...
राज्यात ३४ लाख घरांना मिळाला नळलातूर ः केंद्र शासनाच्या जल जीवन मिशनची राज्यात...
दोन नव्या फुलपाखरांना नागपुरात मिळाला...नागपूर ः पर्यावरण संरक्षणासोबतच पीक परागीकरणात...
द्राक्ष व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांना ...नाशिक : निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे आणि कसबे...
प्रयोगशील शेतकऱ्यांचा शासनाला पडला विसर...नागपूर ः प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन...
देशात साखर उत्पादनात ४० लाख टनांनी वाढलेकोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांनी...
आम्ही शेतकरी कंपनीकडून शेतकऱ्यांना...परभणी ः मांडाखळी (ता. परभणी) येथील आम्ही शेतकरी...
निधीवाटपात कोणावरही अन्याय होणार नाही ः...मुंबई : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी...
उन्हाचा पारा वाढू लागला पुणे ः राज्यातील अनेक भागांत उन्हाच्या झळा वाढू...