agriculture news in marathi kisan sabha will doing agitation on farmers issue pune maharashtra | Agrowon

किसान सभेचे सोमवारपासून राज्यभर आंदोलन ः डॉ. अजित नवले

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

पुणे  ः अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी आहे. कोरडवाहूसाठी ८०, तर बागायतीसाठी १८० रुपये प्रति गुंठा अशी ही मदत असून, ही मदत जाहीर करून राज्यपालांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यामुळे ही मदत आम्ही शेतकरी पंतप्रधान, राज्यपाल आणि कृषी आयुक्तांना परत देणार आहोत. यासाठी सोमवारपासून (ता. २५) राज्यभर करण्यात येईल, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली. 

पुणे  ः अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी आहे. कोरडवाहूसाठी ८०, तर बागायतीसाठी १८० रुपये प्रति गुंठा अशी ही मदत असून, ही मदत जाहीर करून राज्यपालांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यामुळे ही मदत आम्ही शेतकरी पंतप्रधान, राज्यपाल आणि कृषी आयुक्तांना परत देणार आहोत. यासाठी सोमवारपासून (ता. २५) राज्यभर करण्यात येईल, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली. 

येथे मंगळवारी (ता. १९) आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. नवले बोलत होते. या वेळी किसान सभेचे ॲड. अजय बुरांडे, कामगार नेते अजित अभ्यंकर, किसान सभेचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. नाथा शिंगाडे, डॉ. ज्ञानेश्‍वर मोटे उपस्थित होते.

 डॉ. नवले म्हणाले, की नुकसान भरपाईसाठी पीक कापणी प्रयोग रद्द करून, पंचनाम्यानुसार भरपाई जाहीर करावी. बीडमधील शेतकऱ्यांचा २०१८ चा पीकविमा कंपनीने दिलेला नाही. कंपनीच्या विरोधात आम्ही आंदोलन सुरू केले असून, सरकार नसल्याने कंपनीदेखील दखल घेत नाही. सर्वच राजकीय पक्षांचा अतिवृष्टिग्रस्त भागातील दौरा म्हणजे कृषी पर्यटन असून, यानंतर पुढे काहीही झालेले नाही.

काय म्हणाले डॉ. नवले पहा video


इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात साडेसहा हजारांवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात...
सोलापूर : कांदा लिलाव बंद पाडण्याचा डाव...सोलापूर : सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या काही...
कोल्हापूर : शेती, घरांच्या नुकसानीसाठी...कोल्हापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि...
विज्ञान, अध्यात्माच्या ताकदीने देश विश्...कुंडल, जि. सांगली :  ज्ञान, विज्ञान, संगणक व...
संत्र्याचे विपणनाचे जाळे विणण्याची गरज...अमरावती  ः सांघिक तत्त्वावर संत्रा...
फडणवीसांविरोधात पक्षांतर्गत नाराजांची...मुंबई ः भाजपवर विरोधी पक्षात बसण्याची नामुष्की...
कृषी पदवीधर तरूणांनी समाजासाठी काम...नगर : ‘‘देशात प्रामाणिकपणे काम केलेले अनेक शेतकरी...
फडणवीस सरकारची ३१० कोटींची हमी रद्द...मुंबई ः शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र...
आचारसंहितेपूर्वीच्या निर्णयांची...मुंबई ः विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू...
पुणे जिल्ह्यात भातकाढणी अंतिम टप्प्यातपुणे ः पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी...
पश्‍चिम महाराष्ट्रात...पुणे ः पश्‍चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि...
सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना...कऱ्हाड, जि. सातारा ः राजकीय पक्षांचा आदर्श घेऊन...
नगर जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामावर सात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये आता रोजगार हमी योजनेच्या...
चंद्रशेखर भडसावळे यांना मार्टचा ‘फादर...खडकवासला, जि. पुणे : कृषी पर्यटन संकल्पनेचे...
देशी कापूस संशोधन केंद्राचा उद्या...परभणी: वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या...
गांडूळखत अर्क निर्मितीसेंद्रिय शेतीमध्ये गांडुळे व गाडूळखताचे मोठे...
राज्यात काकडीला ५०० ते २००० रुपये दरअकोला येथील बाजारात गुरुवारी (ता. ५) काकडीची...
मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरचमुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २१...
केंद्राने कांदा साठवणूक मर्यादा ५०...नाशिक : गेल्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस...
१ डॉक्‍टर अन्‌ १६ हजार जनावरे !इस्लामपूर, जि. सांगली : वाळवा तालुक्‍यात राज्य...