गोंदिया जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांना 'किसान सन्मान'

गोंदिया जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांना 'किसान सन्मान'
गोंदिया जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांना 'किसान सन्मान'

गोंदिया : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण २ लाख ८६  हजार खातेदार शेतकऱ्यांपैकी २ लाख ५० हजार शेतकऱ्यांकडे दोन हेक्‍टरपर्यंत शेती असल्याची बाब समोर आली. कृषी आणि महसूल विभागाने केलेल्या छाननीअंती हा खुलासा केला. 

केंद्रीय अर्थसंकल्पात दोन हेक्‍टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली होती. प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे तीन टप्प्यांत ही मदत देण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेपूर्वी या योजनेअंतर्गत पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यासाठी सरकारची धडपड सुरू आहे. त्याकरिता मागील आठवड्यापासून कृषी, महसूल विभागाची यंत्रणा पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपडेट करण्यात गुंतली आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या अद्ययावत करण्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्यानुसार जिल्‍ह्यातील एकूण २ लाख ८६ हजार खातेदारांपैकी अडीच लाख शेतकऱ्यांकडे दोन हेक्‍टरच्या मर्यादेत शेती आहे. त्यामुळे जिल्ह्यात अडीच लाखावर शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले.

महसूल आणि कृषी विभागाने तयार केलेल्या याद्याचे प्रत्येक गावस्तरावर वाचन केले जाणार आहे. त्यानंतर कृषी सहायक यादीनुसार संबंधित गावातील शेतकऱ्यांच्या कुटुंबांना भेटी देऊन नावाची खातरजमा करतील. त्यानंतर ही यादी महाऑनलाइनवर अपलोड करून मार्च महिन्यांच्या पहिल्या आठवड्यातच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पहिला हप्ता जमा केला जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com