Agriculture news in marathi, From the Kisan sanman Fund 70 percent of the farmers are deprived | Agrowon

जळगाव : किसान सन्मान निधीपासून ७० टक्के शेतकरी वंचित

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

जळगाव : केंद्राच्या शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या किसान सन्मान निधी योजनेतून खानदेशातील जवळपास ७० टक्के शेतकरी वंचित आहेत. या योजनेबाबत प्रशासनाचे सर्व दावे चुकीचे आहेत. बॅंका व प्रशासनातील मंडळींनी यासंदर्भातील त्रुटी दूर करून कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

जळगाव : केंद्राच्या शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या किसान सन्मान निधी योजनेतून खानदेशातील जवळपास ७० टक्के शेतकरी वंचित आहेत. या योजनेबाबत प्रशासनाचे सर्व दावे चुकीचे आहेत. बॅंका व प्रशासनातील मंडळींनी यासंदर्भातील त्रुटी दूर करून कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

खानदेशात सुमारे नऊ लाख शेतकऱ्यांना या योजनेसंबंधी लाभ मिळणे अपेक्षित आहे. या योजनेबाबत निधीची तरतूद झाली आहे. शेतकऱ्यांपर्यंत योजना पोचविल्याचे दावे प्रशासन करीत आहे; परंतु अद्याप ७० टक्के शेतकऱ्यांना या योजनेतून निधी मिळालेला नाही. दरवर्षी सहा हजार रुपये या योजनेतून शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. तसे आदेश प्रशासनाला दिले आहेत. मध्यंतरी आयएफसी कोडअभावी या योजनेतून संबंधित शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात निधी प्राप्त होत नसल्याची त्रुटी ग्रामसेवक मंडळीने काढली होती. नंतर शेतकऱ्यांनी जुनाट बॅंक पासबुक बदलले. कमाल शेतकऱ्यांचे बॅंक खाते जिल्हा बॅंकांमध्ये आहेत. 

जळगाव जिल्हा बॅंकेत ज्यांची खाती आहेत, त्या शेतकऱ्यांना या योजनेतून निधी मिळालेला नसल्याची नाराजी एका शेतकऱ्याने व्यक्त केली.  तलाठी या योजनेबाबत आपली कोणतीही जबाबदारी नसल्याचे सांगतात. ग्रामसेवकांनी मध्यंतरी शेतकऱ्यांचे आधार कार्ड, सातबारा उतारे, बॅंक पासबुकच्या झेरॉक्‍स घेतल्या होत्या. ज्या शेतकऱ्यांचे बॅंक खाते राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये आहेत, त्यातील कमाल शेतकऱ्यांना या योजनेतून नियमित निधी मिळत आहे.

काही शेतकऱ्यांना एकाचवेळी चार हजार रुपये प्राप्त झाले; तर काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळाले. या योजनेसंबंधी बॅंक खाते किंवा आयएफएससी कोडचा झालेला घोळ दूर करण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही होत नाही. कुणीही या योजनेबाबत जबाबदारी घेत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 


इतर बातम्या
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
शेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...
कृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...
द्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए....पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवापुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या...
विदर्भापाठोपाठ खानदेशात थंडी वाढतेयपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे...
पणन महासंघाकडून ९ कोटी रुपयांचे चुकारेअमरावती ः राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...
कडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान...अकोला  ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत...
नुकसानग्रस्तांना ५,३०० कोटींचा दुसरा...मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा...
अमरावती ‘एसआयटी’कडूनही अजित पवार निर्दोषमुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ...
साहेब, शेतीसाठी दिवसा वीज द्या हो...अकोला  ः रब्बी हंगामात सिंचनाचे काम सुरू...
नांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १...नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी...
पुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर...पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत...
खानदेशात ज्वारीची आवक नगण्य, दरही...जळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
नगर जिल्ह्यात पाण्याअभावी २४० पाणी...नगर : आक्टोबर महिन्यात जिल्हाभर जोरदार पाऊस...
जळगाव जिल्ह्यात सिंचनासाठी धरणांतून पाच...जळगाव  ः पावसाळ्यात सरासरीच्या तीस टक्के...
नगर जिल्ह्यात सरासरीच्या ३१ टक्के...नगर : जिल्ह्यामध्ये यंदा चांगला पाऊस झाल्याने...