‘किसान सन्मान’ निधीच्या वसुलीला जळगाव, धुळ्यात वेग

जळगाव : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (पीएस किसान) अपात्र लाभधारकांना निधी परत करण्यासाठी संबंधित तलाठी कार्यालयात येण्याची गरज नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
Of 'Kisan Sanman' fund Recovery speed in Jalgaon, Dhule
Of 'Kisan Sanman' fund Recovery speed in Jalgaon, Dhule

जळगाव : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (पीएस किसान) अपात्र लाभधारकांना निधी परत करण्यासाठी संबंधित तलाठी कार्यालयात येण्याची गरज नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. हा निधी धनादेशाद्वारे तलाठी कार्यालयात पोस्ट किंवा डाक विभागाच्या मदतीने पाठविता येणार आहे. जळगावसह धुळ्यात हा निधी वसुलीची कार्यवाही जोमात सुरू आहे. 

संबंधितांना गावात नोटिसा बजावल्यानंतर १५ दिवसात हा निधी परत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अन्यथा, सातबारा उताऱ्यावर बोजा चढविण्याचा इशाराही दिला होता. यानंतर अनेक अपात्र लाभार्थींनी हा निधी धनादेशाद्वारे परत करण्यास सुरवात केली. परंतु, काही लाभार्थी परजिल्ह्यात किंवा परराज्यात आहेत.

या लाभार्थींना हा निधी तलाठी कार्यालयात धनादेशाद्वारे परत करायचा आहे. परंतु, वाहतुकीची अडचण, कोरोना व इतर कारणांमुळे अनेक लाभार्थी निर्देशित वेळेत हा निधी परत करू शकत नव्हते. ही बाब लक्षात आल्यानंतर प्रशासनाने हा निधी अपात्र लाभार्थी पोस्टाद्वारे परत करू शकतात, असे स्पष्ट केले आहे. 

आयकर भरणारे अनेक लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. आधार क्रमांक व बँकिंगचे व्यवहार यातून या बाबी समोर आल्या आहेत. यानंतर अपात्र लाभार्थ्यांकडून हा निधी वसूल करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली.

जळगाव जिल्ह्यात सुमारे १३ हजार अपात्र लाभार्थी आहेत. तर, धुळ्यातही सुमारे सात हजार अपात्र लाभार्थी आहेत. वसुलीची आकडेवारी प्रशासनाने जाहीर केलेली नसली, तरी यास गती आली आहे. या पुढील आठवड्यात मोठा निधी वसूल होईल, असा दावा प्रशासनाने केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com