agriculture news in marathi, 'kisan sanman' fund will available in Solapur district Bank | Agrowon

सोलापूर जिल्हा बॅंकेतही मिळणार ‘सन्मान' निधी
टीम अॅग्रोवन
रविवार, 17 मार्च 2019

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणालीमध्ये ('पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टिम') समावेश झाला. त्यामुळे शेतकरी सन्मान निधीसह केंद्राच्या थेट योजनांची रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. राज्याच्या इतर अनुदान योजनांचे पैसेही आता जिल्हा बॅंकेतून मिळण्याची सोय झाली आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणालीमध्ये ('पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टिम') समावेश झाला. त्यामुळे शेतकरी सन्मान निधीसह केंद्राच्या थेट योजनांची रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. राज्याच्या इतर अनुदान योजनांचे पैसेही आता जिल्हा बॅंकेतून मिळण्याची सोय झाली आहे.

शेतकरी सन्मान योजनेचे सर्वाधिक लाभार्थी याच बॅंकेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. सुमारे तीन लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या सहा लाखांच्या आसपास आहे. निम्म्याहून अधिक म्हणजे तीन लाख शेतकऱ्यांची खाती जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत आहेत. 

या पोर्टलवर येण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून बॅंकेच्या प्रशासकांचे प्रयत्न सुरू होते. सार्वजनिक वित्तव्यवस्थापन प्रणाली शासनाच्या योजना राबविण्यासाठी बॅंकांना अत्यावश्‍यक आहे.

राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये ती आहे. प्रामुख्याने शेती आणि शेतीपूरक उद्योगांसाठी कर्जे देणारी बॅंक असल्याने केंद्र आणि राज्याच्या अनेक योजनांतून अर्थसाह्य करण्यात येते. त्यामुळे या प्रणालीत जिल्हा बॅंकेचा समावेश व्हावा, असा प्रस्ताव प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी केंद्राला दिला होता. त्याला मान्यता मिळाली. ही प्रणाली मिळालेल्या काही मोजक्‍याच सहकारी बॅंकांमध्ये आता सोलापूर जिल्हा बॅंकेचाही समावेश झाला.

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...