किसान सन्मान योजनेत नगर जिल्ह्याचा सन्मान 

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत भौतिक तपासणी, या संवर्गातील उत्कृष्ट कामगिरीसाठी देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नगर जिल्ह्याला प्राप्त झाला.
किसान सन्मान योजनेत  नगर जिल्ह्याचा सन्मान In Kisan Sanman Yojana Honor of Nagar District
किसान सन्मान योजनेत  नगर जिल्ह्याचा सन्मान In Kisan Sanman Yojana Honor of Nagar District

नगर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत भौतिक तपासणी, या संवर्गातील उत्कृष्ट कामगिरीसाठी देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नगर जिल्ह्याला प्राप्त झाला. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी (बुधवारी) नवी दिल्ली येथे हा पुरस्कार स्वीकारला. 

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त देशभरातील काही जिल्ह्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात नगरचा समावेश होता. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकूण लाभार्थींपैकी पाच टक्के लाभार्थींची भौतिक तपासणी विहित मुदतीत केल्यामुळे हा पुरस्कार देण्यात आला. 

नगरमधील योजनेवर दृष्टीक्षेप  योजनेत पोर्टलवर नोंदणी झालेल्या लाभार्थींची संख्या ६ लाख ९८ हजार ९१४ आहे. या लाभार्थींच्या बॅंकखात्यांत आतापर्यंत ७१९ कोटी ५८ लाख ७० हजार एवढा निधी पोर्टलद्वारे जमा करण्यात आला आहे. भौतिक तपासणीसाठी २८ हजार ८०२ लाभार्थींची यादी पोर्टलद्वारे प्राप्त झाली होती. त्यात जिल्ह्याने शंभर टक्के काम पूर्ण केले. या २८ हजार ८०२ पैकी २६ हजार ६१२ लाभार्थी पात्र असून, २१९० शेतकरी अपात्र ठरले आहेत. योजनेतील २ लाख ५७ हजार लाभार्थींचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे. त्यांच्या बॅंकखात्यांवरील १ लाख १ हजार १२५ डाटा दुरुस्त करण्यात आला आहे. २२४९ तक्रारी आल्या होत्या, त्यांचे १०० टक्के निराकरण करण्यात आले. अपात्र लाभार्थींकडून ९ कोटी १९ लाख ५६ हजार रकमेची वसुली करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे नोडल अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, राष्ट्रीय सूचना केंद्राचे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गजानन नकासकर, तहसीलदार एफ. आर. शेख, शरद घोरपडे व सुनीता जऱ्हाड, नायब तहसीलदार वरदा सोमण, अव्वल कारकून संदेश दिवटे व आय.टी. असिस्टंट रोहित शिंदे यांनी जिल्हास्तरावर कामकाज पाहिले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com